pub-7425537887339079
ब्रेकिंग

प्रा. दत्ता देशमुख यांच्या बाजी पासलकर या पुस्तकच्या मुखपृष्ठाचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते विमोचन

0 5 4 4 6 2
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.24

टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील इतिहासाचे प्राध्यापक माझी प्राचार्य दत्ताजिराव देशमुख टेंभुर्णी कर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा निष्ठावंत सरदार बाजी पासलकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक येत असून त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे विमोचन जळगाव चे आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजू मामा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांमध्ये वेद रायगडाचे प्रतिष्ठान महाराष्ट्राचे सर्वेसर्वा, त्याच प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील, वेध रायगड प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या सचिव, इतिहास प्रबोधन संस्थेच्या सचिव भारती ताई साठे, इतिहासाच्या पहिल्या विश्व शिवचरित्र साहित्य संमेलनाचा लोगो तयार करणारे प्रसिद्ध चित्रकार संतोष राव आवटी, सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव यांची उपस्थिती होती. रवींद्र पाटील यांनी पुस्तकाच्या संदर्भातील संकल्पना स्पष्ट केली व छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांच्या पुस्तकाच्या मालिकेतील पहिले पुस्तक आणि सादर करताना आनंद होत आहे असे या प्रसंगी उपस्थित लोकांच्या समोर सांगितले. याप्रसंगी राजू मामा भोळे यांनी सांगितले तर रायगडाचा प्रचार महाराष्ट्र व इतिहास प्रबोधन संस्था महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये सुद्धा छत्रपती शिवरायांची लोकांसमोर मांडत असताना सत्ते इतिहास मांडण्याबरोबरच छत्रपती शिवरायांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढले अशा सरदारांनी जी मालिका यावर पुस्तके प्रकाशित करण्याचा मानस आहे त्याला शुभेच्छा देतानाच बाजी पासलकर या निष्ठावंत कार्यकर्त्यावर पुस्तक येत आहे त्याबद्दल मला मनस्वी आनंद झाला आहे. जालना जिल्ह्यातून प्राध्यापक दत्ता देशमुख हे इतिहास लेखनासाठी पुढे येत असताना त्यांनी माझ्या हस्ते पुस्तकाच्या मुखपृष्ठाची विमोचन केले त्याबद्दल त्यांनी आभार मानले. या इतिहासाच्या कार्याला मनाशी शुभेच्छा सुद्धा दिल्या. इतिहास लेखकांनी पुढे येऊन छत्रपती शिवरायांचा इतिहास लोकांसमोर मांडावा अशी इच्छा आहे त्यांनी व्यक्त केली. इतिहास प्रबोधन संस्थेच्या सचिव भारतीय ताई साठे यांनी याप्रसंगी उपस्थितांचे आभार मानले. या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार असून प्रकाशन पूर्व पकावर सवलत ही जाहीर केली आहे. शब्दप्रभू प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असून या प्रकाशनाच्या प्रमुख भारतीताई साठे, रवींद्र पाटील हे आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 4 6 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे