pub-7425537887339079
ब्रेकिंग

तालुक्यातील वीज समस्या साठी थेट मनसे नेत्यांना निवेदन.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांना दिले निवेदन

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 11

ग्रामीण भागातील विजेच्या समस्या वाढत असल्याने छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसीय दौऱ्यावर आलेले मनसे नेते बाळा नांदगावकर यांची आज सुभेदारी गेस्ट हाऊस येथे भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. महावितरण मार्फत मराठवाड्‌यातील शेतातील सिंगल फ्युज लाईट बंद केली जात आहे. जालना जिल्हातील जाफ्राबाद तालुका बंद झालेला आहे, शेतातील वाड्या, वस्त्या, तांडा यांना रात्री सिंगल फ्युज लाईट चालू ठेवणे बाबतची विनंती निवेदन द्वारे करण्यात आली.

मराठवाड्यातील शेतातील सिंगल फ्युज लाईट बंद केली जात आहे. जालना जिल्ह्यात तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.जालना जिल्ह्यातील सर्व शेतातील वाड्या, वस्त्या, तांडा या ठिकाणची सिंगल फ्युज लाईट बंद केली आहे. अनेक शेतकरी आपल्या सोयीनुसार शेतात राहण्यासाठी गेले आहेत शेतकऱ्यांनी आपल्या वस्तीवर रोहित्र बसवून मीटर घेतलेले आहे. महावितरण चे कर्मचारी ग्राहकांना न सांगता जुने मीटर घेऊन गेले व स्मार्ट मिटर बसवले त्यामुळे येणारे जास्तीचे वीज बील तेथील शेतकरी भरत आहे. असे असूनही एक फ्युज रात्रीला दहा वाजता सोडतात सकाळी सहा वाजता बंद करतात. त्यामुळे शेतातील वाड्या, वस्त्या, तांडा येथे राहणा-या नागरीकांना रात्री अंधारात रहावे लागत आहे. हा एक प्रकारचा त्यांच्यावर अन्याय होत आहे.

महावितरणने घेतलेला हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. तरी शेतकऱ्यांची मागणी आहे की, किमान सायंकाळी पाच ते सकाळी सहा पर्यंत सिंगल फ्युज लाईट चालु ठेवावी.अशी तेथील नागरीकांची मागणी आहे. आता पावसाळा दिवस सुरू आहे, रानातील साप, विचू असे अनेक प्रकारचे विषारी किटक रात्री बाहेर निघतात. तेथे राहणा-या नागरीकांना व जनावरांच्या जीवाला धोका होऊ शकतो, रात्री दहा वाजता लाईट येते मुलांच्या अभ्यास होत नाही, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, आम्ही उपकार्यकारी अभियंता साहेब उपविभाग कार्यालय जाफराबाद यांच्या सोबत सुद्धा चर्चा केलेली आहे, त्यांनी सांगितला हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे. त्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही, जालना कार्यकारी अभियंता साहेब यांच्या सोबत चर्चा केली, त्यांचा हाच प्रश्न आहे की तो संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे. त्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही, तरी मा. राज साहेब ठाकरे व मनसे नेते मा.बाळा नांदगावकर यांना विनंती करण्यात येते की, आपण हि समस्या आपल्या मार्फत महाराष्ट्र शासनाकडून सोडवून घेऊन महाराष्ट्रातील सर्व शेतातील वाड्या, वस्त्या, तांडा या ठिकाणी राहणा-या नागरीकांना नाय द्यावा, अशी विनंती पंढरीनाथ म्हस्के मनसे तालुका सरचिटणीस जाफ्राबाद यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे