pub-7425537887339079
ब्रेकिंग

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला संत मुक्ताई पालखी सोहळा व रिंगण सोहळ्याच्या पुर्वतयारीचा प्रत्यक्ष आढावा

0 4 5 5 2 6
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.01

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याच्या तसेच जिल्ह्यात प्रथमच आयोजित होत असलेल्या रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन विविध विभागांच्या पुर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पालखी सोहळा व रिंगण सोहळा निर्विघ्न, सुरक्षित, शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी मित्तल यांनी वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी सर्व विभागांनी योग्य नियोजन करुन आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश दिले. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, अखंडित वीज पुरवठा, आरोग्य सुविधा औषधीसाठा, तात्पुरती वैद्यकीय पथके, मोबाईल व सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच मुक्कामस्थळी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, संवेदनशील ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवणे तसेच आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्याचबरोबर अग्निशमन, महसूल, सार्वजनिक बांधकाम, ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, महावितरण, सार्वजनिक आरोग्य, पशुसंवर्धन, अन्न व औषध प्रशासन, परिवहन तसेच इतर सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करून वारकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पालखी मार्गावरील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, अन्नपदार्थांची तपासणी, सार्वजनिक आरोग्य विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यावर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान विशेष भर दिला. जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या रिंगण सोहळ्याच्या अनुषंगाने जालना शहर महानगरपालिकेमार्फत स्वच्छता, आरोग्य सुविधा, मोबाईल टॉयलेट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज पुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, व्यासपीठ उभारणी तसेच इतर सर्व आवश्यक नागरी सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, आवश्यकतेनुसार वाहतूक वळविणे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी सक्षम नियोजन करण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले. सर्व यंत्रणांनी क्षेत्रीय स्तरावर नियमित पाहणी करून स्थानिक प्रशासनाशी सातत्याने समन्वय राखावा तसेच कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 2 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे