ग्रामीण जीवनात,आधुनिक जगाच्या युगात, आजही पारंपारिक वस्तूची गरज भासते.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.4
सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. आजही दिवाळीचा सण हा आनंद उत्सव आणि समृद्धीचा सण म्हणून समजल्या जातो. या सण उत्सवामध्ये अनेक वस्तूंची गरज भासते. दिवाळीचा सण आनंदाचा क्षण म्हणून ओळखला जातो. या आनंदाच्या उत्सवामध्ये दिवाळीच्या सणांमध्ये सुद्धा पारंपारिकतेची जोड आवश्यक असते. या दीपावलीच्या सणांमध्ये अनेक गोष्टी ची गरज भासते. हिशोबाच्या वह्या, वर्षभर रोकड वापरण्यासाठी लागणाऱ्या वह्या, याबरोबरच खाद्यपदार्थांच्या वस्तू, या खाद्यपदार्थाच्या वस्तूमध्ये अनेक वस्तू या आजच्या आधुनिक जगात रेडिमेड पद्धतीने मिळतात परंतु, प्राण काळापासून चालत आलेल्या ज्या वस्तू आहे त्या वस्तू आजही पारंपारिकतेची जोड म्हणून बाळगल्या जाते. पारंपारिकतेची जोड या सणाला ग्रामीण भागामध्ये, पणत्या, बोळके, महालक्ष्मीच्या मूर्ती, दीप लावण्यासाठी अनेक पारंपरिक कुंभाराकडे मिळणाऱ्या वस्तू, अत्यावश्यक असतात. दीपावलीच्या सणात या वस्तूंना अधिक मागणी असते. शहरी भागात तयार करून मिळणाऱ्या या वस्तू रेडिमेड पद्धतीने मिळतात परंतु आजही ग्रामीण भागामध्ये पारंपारिकतेची जोड ही दिल्या जाते. पारंपारिक ते बरोबरच त्या पाठीमागे सण उत्सवाच्या भावना सुद्धा जोडलेल्या असतात. त्या भावना जोपासण्याचं काम आजही ग्रामीण भागामध्ये कुंभार वर्ग मोठ्या प्रमाणात असून तो ह्या वस्तू पारंपारिक पद्धतीने बनवून देण्यासाठी पुढाकार घेत असतो. त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून ते या वस्तू बनवत असतात. पूर्वी ग्रामीण भागामध्ये उदरनिर्वाच साधन म्हणून या वस्तूकडे बघितली या जात असतानाच सणासुदीच्या काळात या वस्तू तयार करण्याचे काम केल्या जायचे. वर्षभराचा उदरनिर्वाह करण्याचे काम या वस्तू बनवणारे करत असत. आजही जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरातील सावंगी या गावी हा मोठा वर्ग काम करत असतो. येथील बबनराव आणि दत्ता राऊत हे काम करत असतानाची छायाचित्रे आमच्या वृत्त प्रतिनिधी मिळवली आणि त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आजच्या आधुनिक जगातही पारंपारिक तिची जोड म्हणून या वस्तू आम्ही बनवत असतो आणि त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह चालत असतो हे त्यांनी आवर्जून या ठिकाणी सांगितले. हे सर्व पारंपारिक व्यवसाय करूनच आम्ही पुढे जात असतो वर्षभराचे धान्य या आमच्या पारंपारिकतेला जोड देऊनच आम्ही कमवत असतो आणि वर्षभर उदरनिर्वाह करत असतो हे त्यांनी आवर्जून आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ग्रामीण भागाचा हा जो सणासुदीचा कणा आहे तो आज कुठेतरी या आधुनिकच्या जगात मागे पडत असतानाच आजही दीपावलीच्या सणांमध्ये या वस्तूंना फार मोठी मागणी असते.



