pub-7425537887339079
ब्रेकिंग

मेरखेडा जिल्हा परिषद शाळेत व्यवस्थापन समिती गठीत

अध्यक्षपदी प्रमोद जाधव, उपाध्यक्षपदी गणेश जाधव यांची निवड

0 4 8 0 9 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.19

जाफ्राबाद तालुक्यातील मेरखेडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद संजय जाधव, तर उपाध्यक्षपदी गणेश देविदास जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

शाळेच्या विकासासह विद्यार्थ्यांची शैक्षणिक

प्रगतीण्या आणि शाळविविधस्था उपक्रामती प्रभावीपणे महत्त्वाची असते. त्यानुसार शाळेत समितीची निवड प्रक्रिया पार पडली.

यावेळी गावचे सरपंच सुखदेवराव जाधव, उपसरपंच गणेश आबा जाधव, अंकुशराव जाधव, दिपकराव जाधव यांची उपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापक भगवान भालके यांनी समिती गठीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. नवीन समितीच्या माध्यमातून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 0 9 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे