तक्षशिला बौद्ध विहारामध्ये महात्मा फुले जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा!

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.16
जालना येथील तक्षशीला बहुउद्देशीय संस्था आयोजित महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशतकोत्तर जयंतीनिमित्त प्रा.डॉ.बसवराज कोरे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. समाजाचे परिवर्तन होण्यासाठी पुस्तकांचे वाचन होणे गरजेचे आहे. सर्व समावेशक धर्मांचा अभ्यास महत्वाचा आहे,तो सर्वांनी केला पाहिजे असा सल्ला डॉ. बसवराज कोरे यांनी दिला. प्रा.किशोर साळवे यांना पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल विशेष सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मनोविकार तज्ञ डॉ. लुम्बिनी (जिल्हा सामान्य रुग्णालय), विशाखा माने(समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय सिविल हॉस्पिटल जालना) तक्षशिला बौद्ध विहाराचे अध्यक्ष भिकाजी साळवे, चंद्रकांत वाघमारे, अशोक गंगावणे, राजेश बगळे, प्रल्हाद वाघ, वळसे सर, डॉ.निहाळ सर, चव्हाण सर, डॉ.बुक्तरे सर, सचिन भारोटे, फूके सर, राठोड सर,सुप्रिया बगळे, प्रा.संभाजी कांबळे, राहुल खरात, मारुती गायकवाड,ज्योती मगरे, मिनाबाई शरणागत, महेश शिंदे, तसेच तीस आदर्श शिक्षकांचे सत्कार यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री महेंद्र साळवे यांनी केले सूत्रसंचालन संदीप इंगोले तर आभार प्रदर्शन प्रा.संभाजी कांबळे यांनी केले.


