pub-7425537887339079
ब्रेकिंग

राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत ILO परीषदेसाठी जिनिव्हा येथे रवाना

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि 1

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) तर्फे जागतिक परीषदेचे १ जून ते १२ जून २०२६ रोजी जिनिव्हा (स्विझर्लंड) येथे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये जगभरातून कंपनीचे मालक, देशाचे कामगार मंत्री, कामगार प्रतिनिधी असे ९००० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी INTUC या राष्ट्रीय संघटनेतर्फे न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत यांना केंद्र सरकारच्या मान्यतेने भारतीय कामगारांचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान मिळाला आहे. त्यासाठी ते १ जून आपला वाढदिवस बाजूला ठेवून ३० मे रोजी जिनिव्हा येथे रवाना झाले. या परिषदेसाठी सन २०१८ मधे सुद्धा त्यांची निवड झाली होती. या परिषदेमधे जागतिक पातळीवर कामगारांच्या समस्यांवर चर्चा केली जाते व तसे कायदे बनविले जातात. कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारां प्रति करत असलेल्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांची दुसऱ्यांदा ILO च्या जागतिक परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे