pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालना शहरातील एकल महिलांचे सर्वेक्षण होणार

0 4 8 0 9 5
[sp_wpcarousel id="1375"]

जालना शहरातील एकल महिलांचे सर्वेक्षण होणार
सक्षमीकरण व शासकीय योजनांच्या लाभासाठी नोंदणी सुरु होणार

*जालना, दि. 21 ऑगस्ट 2026*

_जालना शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील एकल महिलांची माहिती एकत्रित करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी व शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे._

या संदर्भात _मा. आयुक्त सौ. अंजली शर्मा_ यांच्या आदेशाने लवकरच शहरातील एकल महिलांची नोंदणी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती _जालना शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. संध्या संजय देठे_ यांनी दिली.

सौ. देठे म्हणाल्या, “शहरातील एकल महिलांची अद्ययावत माहिती संकलित करून त्यांच्यासाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आहे. एकल महिलांचे सक्षमीकरण ही आमच्या प्राधान्याची बाब आहे.”

या सर्वेक्षणामध्ये एकल महिलांची सामाजिक, आर्थिक वैयक्तिक माहिती नोंदवून डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना आरोग्य, शिक्षण, रोजगार, गृहनिर्माण व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ सुलभतेने मिळू शकेल.

महानगरपालिकेच्या वतीने लवकरच प्रभागनिहाय नोंदणीला सुरुवात होणार आहे. सर्व एकल महिलांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन माहिती द्यावी, नगरपरिषद प्रशासन संचनालय नवी मुंबई शीला पाटील यांनी जालना शहर महानगरपालिकेला आदेश काढले आहे

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 0 9 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे