pub-7425537887339079
ब्रेकिंग

पाऊले चालती पंढरीची वाट —–ह. भ. प विठ्ठल महाराज टेंभुर्णी कर

0 4 6 1 8 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.15

पाऊले चालली पंढरीची वाट विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आजी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल आध्यात्मिक परंपरेमध्ये संतांनी आपले जीवन समर्पित केले आहे एवढी मोठी भक्तीची परंपरा लाभलेल्या वैष्णवाच्या वारीच्या शुभेच्छा हे अत्यंत प्रसिद्ध संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायाची किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेतील अभंग वचन आहे याचा अर्थ असा की विठ्ठल हा सर्वत्र पाण्यात आणि जमिनीवर भरून राहिला. कोणतीही जागा रिकामी नाही आज मी त्याला माझ्या ज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तेव्हा मला सर्वत्र केवळ विठ्ठल दिसला अशाच युक्तीप्रमाणे धन्य धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा शिन गेला मज वाटे अशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण.. संत एकनाथ महाराजांच्या या अभंगातून पांडुरंगाच्या भेटीची उत्कट ओढ व्यक्त होते याच भक्तीवादातून लाखो भाविक पंढरपुरला पायी वारीमध्ये जातात विठ्ठल भक्ति मध्ये आषाढी देवशयनी एकादशी चे महत्व अनन्यसाधारण आहे या दिवशी भगवान विष्णू विठ्ठल चार महिन्यासाठी योगनिद्रेत जातात या पवित्र दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते वारकरी सांप्रदायात या दिवसाला वर्षातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत ज्ञानबा तुकाराम नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होतात आणि विठ्ठलाच्या दर्शनाने धन्य होतात या देवशयनी एकादशी पासून देव चार महिन्यासाठी झोपेत जातात या काळात विठ्ठलाची भक्ती नामस्मरण भजन कीर्तन आणि दानधर्माला विशेष महत्त्व असते या दिवशी उपवास केल्याने आणि विठ्ठलाची निसिम भक्तीत लीन झाल्याने मनातील वाईट विचारांचा नाश होतो मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो अशी श्रद्धा आहे वर्षातील 24 एकादशी पैकी देवशयनी एकादशीला विशेष स्थान आहे पद्मपुराणामध्ये असे सांगितले आहे की या एकादशीचे व्रत पाळल्याने मागील पापाची शालन होते आणि इच्छा पूर्ण होतात तसेच दैवी शक्तीशी नाते जोडण्यासाठी आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी एकच शक्तिशाली दिवस आहे सोलापूर पौराणिक कथेनुसार माधता नावाचा एक प्रजापती राजा होता त्याच्या राज्यात सलग तीन वर्ष पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडला होता प्रजेच्या कल्याणासाठी राजा ऋषीमुनी कडे उपाय विचारू लागला तेव्हा ऋषींनी सांगितले की राजाला राजाच्या राज्यात एक एक राक्षसी वृत्तीचा मनुष्य नियमाच्या विरुद्ध जाऊन तपस्या करत आहे जोपर्यंत त्याला शिक्षा मिळत नाही तोपर्यंत पाऊस पडणार नाही परंतु राजाने एका निरप्रात व्यक्तीचा वध करण्यास स्पष्ट नाकार दिला या संकटातून सुटका मिळवण्यासाठी ऋषींनी दुसरा मार्ग विचारला तेव्हा ऋषींनी राजाला आषाढ महिन्यातील शुक्लपक्षातील देवशयनी एकादशीचे व्रत पूर्ण विधीपूर्वक करण्यास सांगितले राजाने प्रजे सहयीव्रत पाले त्यांच्या प्रभावामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडला आणि सर्वत्र सुबत्ता आली या दिवशी विष्णू निद्रेत गेल्यावर सृष्टीच्या पालनाचे कार्य भगवान शिव स्वीकारतात या काळात साधू संत एकाच ठिकाणी राहून जप आणि तब ध्यान करतात चार महिन्यातील कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी देव उठणी एकादशीला भगवान विष्णु पुन्हा जागे होतात पौराणिक कथेप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला भरभरून पाऊस पडू द्या बळीराजा सुखी राहू द्या अशी समस्त भाविकांच्या वतीने विठुरायाच्या चरणी प्रार्थना सर्वत्र होत आहे पंढरपूरला पुंडलिकाच्या आई-वडिलांच्या सेवेत प्रतिभक्ती प्रति भगवान कृष्णाला वाटले की आपण पुंडलिकाच्या भेटीला पंढरपूरला जावी त्यामुळे आई-वडिलांची सेवा बघून साक्षात भगवान कृष्ण पुंडलिकाच्या भेटीसाठी पंढरपूरला आली साक्षात परब्रम्ह आलेलं हे पंढरपूर महान तीर्थ आहे पुंडलिकाच्या भेटी परब्रम्ह आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा या युक्तीप्रमाणे भीमा नदीचा रूपांतर चंद्राच्या कोरीप्रमाणे असल्यामुळे चंद्रभागे चं नाव त्याला मिळालं ज्यावेळेस पांडुरंग पुंडलिकाच्या भेटीला आले त्यावेळेस त्याची आई वडिलांची सेवा चालू होती त्यावेळेस त्याने एक वीट देवासमोर फेकली आणि देवाचे आदरतीत्य केले वर्ण काळामध्ये कौस्तुभ माळा असे तेही मोहक पांडुरंगाचे रूप आजही पंढरपूर येथे विटेवरी उभे आहे भगवान कृष्ण दिसत पंढरपूरला गेले अजून आले नाही म्हणून रुक्मिणी पांडुरंगाला बघण्यासाठी पंढरपूरला नंतर आली म्हणून रुक्मिणी मातेची आणि पांडुरंगाचे मंदिर वेगवेगळ्या स्थानी आहे पांडुरंगाच्या भेटीसाठी सर्वात पहिल्यांदा कैलास पर पर्वताहून नंदीवर बसून शिवपार्वती कार्तिक स्वामी गणपती बाप्पा सह गेले तेव्हापासून पंढरपूरला वारीला जाण्याची प्रथा आहे समस्त वारकरी सांप्रदाय पंढरपूरला जाऊन देवाजवळ जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात देवशयनी एकादशीच्या दिवशी पिवळे वस्त्र किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे म्हणजे ते विष्णू प्रिय वस्त्र आहे त्यामुळे वारकरी संप्रदायातील व्यक्ती पांढऱ्या किंवा पिवळ्या वस्त्र परिधान करतात सध्या जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथून बरेच भाविक पदयात्रेसाठी कोणी वाहनाने कोणी आळंदीहून गेलेले आहेत हजारोच्या संख्येने गेलेले आहेत. सध्या आधुनिकतेच्या युगात भक्ती मार्गामध्ये बरीच वाढ झालेली आहे लोक भक्ती भावाने आपापल्या सोयीनुसार पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात आम्ही सुद्धा गेल्या आठ वर्षापासून टेंभुर्णी येथून पांडुरंगाच्या दर्शनाला एकादशीला जातो त्यामुळे मानसिक समाधान लाभते पुरोहित विठू महाराज

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 8 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे