टेंभुर्णीतील शिवाजी नगर चौक येथे पोलिसाकडून अचानक वाहनांची तपासणी.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.26
टेंभुर्णी येथील शिवाजी नगर येथे शासनाच्या आदेशाने प्रत्येक पानाची कसून तपासणी करून यामध्ये ट्रिपल सीट लायसन अल्प वईन चालक जोरात चालणारे तरुण यांची सर्वांची तपासणी करण्यात आली असून या वेळी सहाय्यक पोलीस उप निरीक्षक बाबासाहेब खार्डे यांच्या सह पोलिस कर्मचारी या वेळी वाहनाच्या तपासणीत व्यस्त होते. या वेळी अचानक सुरू झालेल्या या तपासणी मुळे वाहण्याच्या लांब रांगा लागल्या होत्या.
रोड वरील वाढते,अपघात वाढते घटना वाहन चोरी असे अनेक प्रकार वाढल्यामुळे या वर अंकुश लावण्याच्या आमचा प्रयत्न असल्याचे या वेळी बाबासाहेब खार्डे यांनी सांगून जो चालक या सगळ्या गोष्टी पाळणार आहे त्याला आम्ही त्रास देणार नाही असे ही सांगितले.
या वेळी अनेक वाहनावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.


