pub-7425537887339079
ब्रेकिंग

पावसाच्या उघडिपीनंतर कोळपणीला वेग टेंभुर्णी परिसरातील शिवारे गजबजली

0 4 8 7 6 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.19

टेंभुर्णी:गेल्या काही दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे टेंभुर्णीसह जाफराबाद तालुक्यातील पिके चांगलीच जोमात आली आहेत. दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने शेतात उतरून कोळपणीच्या (डवरणी) कामांना सुरुवात केली आहे. पिकांमधील तण काढून जमीन भुसभुशीत करण्यासाठी शिवारात सध्या शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे.पिकांच्या वाढीसाठी कोळपणी महत्त्वाचीचालू खरीप हंगामात कपाशी, सोयाबीन आणि मका या पिकांची वाढ चांगली झाली आहे. मात्र, पिकांसोबत शेतात नको असलेले गवतही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. हे तण वेळेत नष्ट केले नाही, तर पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी पहाटेपासूनच बैलजोडी घेऊन शेतात कोळपणी करत आहेत. या प्रक्रियेमुळे जमिनीला हवा मिळते आणि पिकांची मुळे मजबूत होऊन पिकांची वाढ दुप्पट वेगाने होते.मजूर टंचाईवर बैलजोडीचा आधारसध्या ग्रामीण भागात शेतीकामांसाठी मोठ्या प्रमाणावर मजूर टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत ट्रॅक्टरपेक्षा पारंपरिक बैलजोडीच्या साहाय्याने केलेली कोळपणी अधिक फायदेशीर ठरत आहे. पिकांच्या ओळींमधून सुरक्षितपणे कोळपणी करण्यासाठी शेतकरी स्वतः आपल्या कुटुंबासह शेतात राबत आहेत.निसर्गाची अशीच साथ राहिल्यास यंदा तालुक्यात कपाशी आणि सोयाबीनचे बंपर उत्पादन होईल, अशी आशा टेंभुर्णी परिसरातील बळीराजा व्यक्त करत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 7 6 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे