शिर्डीतील काव्यगंध कवी संमेलनात कवी परशुराम मुळे यांच्या कवितेचे सादरीकरण

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.31
शिर्डी येथील शांती कमल हॉलमध्ये काव्यगंध,साहित्य समूहाचे तिसरे राज्यस्तरीय कवी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले ज्येष्ठ चित्रपट गीतकार कवी व लेखक मा.बाबासाहेब सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पाडला.या कवी संमेलनात जवळपास ७५ कवींनी सहभाग नोंदविला होता.या कवी संमेलनात जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील कवी परशुराम मुळे यांनीआपल्या कवितेतून शेतकरी बापाच्या दुःखाचे वर्णन केले या कवितेला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. जगाचा पोशिंदा म्हणून त्याचे किती गाव गुण.. दलाल आडते सारे मिळून त्याचे पिळवीती कान.. सरनावर त्याच्या मग पॅकेज येथे सरकार मायबाप.. भूईत काळ्या राबवून जसा बैल टाके धाप… तसा संसाराच्या नांगराले जुंपला मवा बाप.. ही कविता सादर करून प्रेक्षकाची मने जिंकली.याप्रसंगी मा. बाळासाहेब गिरी,मा.हेमलता गीते,मा.भारत सातपुते,मा.अमोल चिने,मा.गजानन उफाडे,मा.रज्जाक शेख आदी साहित्यिक व्यासपीठावर उपस्थित होते.या कवी संमेलनाचे आयोजक काव्यगंध साहित्य साहित्य समूहाच्या संस्थापक अध्यक्षा अक्षशिलाताई शिंदे व प्रशांत गोरे यांनी केले होते.




