pub-7425537887339079
ब्रेकिंग

तालुक्यातील विविध विकासकामे कधी पूर्ण करणार ?

तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन....

0 4 8 6 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त, तालुक्यातील विकास “तुमसे न हो पायगा” यासाठी तालुका शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील शासनाच्या विविध योजनांमधून सुरू करण्यात आलेली विकासकामे अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत. ही कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देत शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात शासनामार्फत विविध योजनांमधून विकासकामे मंजूर करून सुरू करण्यात आली आहेत. मात्र, अनेक कामे आजघडीला अर्धवट असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. कामे पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यातील प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करणार का?, जाफराबाद शहराची पाणी पुरवठा योजना कधी पूर्ण करणार का?, यासह सोनेखेडा येथील साठवण तलावातील बॅक वॉटर क्षेत्रातील बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यात याव्या. नदीवरील पुलाचे कामही तातडीने पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा, तसेच पिक विमा कंपनीने पिक विमा भरण्यासाठी पोर्टलवर मंजूर विमा दाखवून परत नामंजूर दाखवण्याच्या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. फसव्या पद्धतीने शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, असे निवेदनात नमूद आहे. तर अर्धवट राहिलेली सर्व विकासकामे तातडीने पूर्ण करून नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन स्वीकारतांना तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी तथा महसूल कर्मचारी श्री धनराज भुते, तर उपस्थितांमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश पा गव्हाड, तालुका प्रमुख कुंडलिक पा मुठ्ठे, माजी तालुका प्रमुख शिवाजीराव गावंदे,माजी जि.प. अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंगेश गव्हाड, तालुका युवा अधिकारी मुकेश माकोडे,ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी सरपंच विष्णू पा.म्हस्के,
माजी प.स.सदस्य रमेश गायकवाड, चंदू पा.शिंदे,शिवाजी म्हस्के, योगेश कापसे,संतोष जाधव, भागवत घोडके,गणपत बनकर, प्रल्हाद बनकर,प्रभाकर जंजाळ, विष्णु लोखंडे,गोविंदा माकोडे, अमोल नरवाडे,विमोचन बोरसे नंदकिशोर भालके,सलमान पठाण, नागोराव बंगाळे,परमेश्वर गायकवाड,दीपक तायडे,दगडूबा मोकळे, नंदकिशोर गायकवाड, सुभाषराव परिहार, गणेश तुपे, सुलतान कुरेशी,नितीन परिहार, रामदास झोरे,संदीप परिहार,विष्णू उबाळे,सुभाष काळे,सांडू फदाट, यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते….

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 6 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे