pub-7425537887339079
ब्रेकिंग

बीटस्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0 4 8 3 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29

जालना शहरातील प्रशाला मुलांची येथे दहा केंद्रांमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांची बीटस्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांमधील तीनही गटांतील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
आपापल्या केंद्रांवर प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी बीटस्तरावर प्रभावी इंग्रजी वक्तृत्व सादर केली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, उच्चार व इंग्रजी भाषेतील संवादकौशल्य पाहून उपस्थित शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक व अभिनंदन केले. इंग्रजी भाषेत उत्स्फूर्तपणे वक्तृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले.गटशिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली वि.सा.व्य. सी. बी. जाधव, कैलास गायकवाड, एस. यू. गायकवाड व प्रफुल्ल राजे यांच्या सहकार्याने स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. जिल्हा परिषद प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती डॉ. मेहेत्रे यांनी सुंदर व्यवस्था करून दिल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.स्पर्धेच्या निकालामध्ये अ गटात राजेश अनिल जाधव व श्रेया अनिल भालसामिंद्र, ब गटात अक्सा शेख व कृष्णाई विकास नाईक, तर क गटात अदिती नीरज राय हिने प्रथम क्रमांक आणि भक्ती लोखंडे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचे परीक्षण श्रीमती अख्तर कुरेशी, नंदा वालकट्टी व दीपाली बेहरे यांनी परीक्षक म्हणून केले.जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेविषयीची भीती दूर करून त्यांच्यामध्ये इंग्रजी भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी इंग्लिश टीचर्स फोरम सातत्याने प्रयत्नशील आहे. शिक्षण विभाग, जालना यांच्या सहकार्याने तसेच अखिल भारतीय मारवाडी युवा मंच, अंबड शाखा आणि विनोदराय इंजिनिअरिंग यांच्या आर्थिक सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत आत्मविश्वासाने व्यक्त होता यावे, या उद्देशाने आयोजित केलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे