राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

जालना/प्रतिनिधी,दि.13
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.
मंत्री श्री. सावकारे यांचे शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथून रेशीम कोष बाजारपेठ, जालना येथील इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमाकरीता शासकीय वाहनाने रवाना. सकाळी 10.00 वाजता जालना येथील रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रम समारंभास उपस्थित राहतील. सकाळी 11.40 वाजात मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत जालना येथील विविध कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.00 वाजता मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत जालना येथील विविध कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.00 वाजता मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत छत्रपती संभाजीनगरकडे रवाना व विविध कार्यक्रमास उपस्थित राहतील.




