pub-7425537887339079
ब्रेकिंग

हभप डॉ प्रमोद कुमावत यांचे झी टॉकीजवर प्रवचन

0 4 7 4 5 4
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/दत्ता देशमुख,दि 1

संत साहित्याचे व वेदांत तत्त्वज्ञानाचे अभ्यासक ह.भ.प. डॉ. प्रमोद कुमावत यांचे झी टॉकीज वाहिनीवर 5 व 6 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत प्रवचन होणार आहे. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हा कार्यक्रम झी टॉकीजवर चांगला गाजत आहे, यात परतीची वारी या विशेष भागात ही प्रवचने होणार आहेत.

डॉ प्रमोद महाराज कुमावत हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना येथे वरिष्ठ अधिव्याख्याता म्हणून सेवेत आहेत. चैतन्यसाधना प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष असून या प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, भगवतगीता अभ्यास वर्ग, कठोपनिषद अभ्यास वर्ग असे विविध आध्यात्मिक ग्रंथांचे अभ्यास वर्ग तसेच विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यापूर्वी झी टॉकीज वाहिनीवर त्यांचे 21 कीर्तने प्रसारित झालेली आहेत. या प्रवचनाचा लाभ संतसाहित्याचे अभ्यासक तसेच भाविकांनी घ्यावा असे आवाहन चैतन्य साधना प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 4 5 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे