pub-7425537887339079
ब्रेकिंग

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; नाशिक येथे 10 दिवसांचे मोफत पूर्व प्रशिक्षण

0 4 0 5 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.25

भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी पदावर भरती होऊन देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनाने प्रशिक्षणाचे द्वार खुले केले आहे. नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे दि.4 मे ते 13 मे 2026 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 65 चे आयोजन करण्यात आले आहे. तरी यासाठी जालना जिल्ह्यातील पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि.24 एप्रिल 2026 रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना 10 दिवसांच्या या कोर्समध्ये तज्ज्ञांमार्फत सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची सखोल पूर्वतयारी करून घेतली जाईल. विशेष म्हणजे प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सोय शासनातर्फे करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी दि.24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. उमेदवारांनी येताना सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या संकेतस्थळावरून एसएसबी-65 कोर्सचे प्रवेशपत्र आणि परिशिष्टांची प्रिंट पूर्ण भरून सोबत आणणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांच्या ०२५३-२४५१०३२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९१५६०७३३०६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे