टेंभूर्णीत ३० ऑगस्टला रंगणार भव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव; ‘हरे कृष्ण’ महामंत्राच्या गजराने नगरदुमदुमणार

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे
येत्या रविवार, दिनांक ३० ऑगस्ट रोजी टेंभूर्णी नगरीत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर एका भव्य आणि अध्यात्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामुळे संपूर्ण टेंभूर्णी नगर ‘हरे कृष्ण’ महामंत्राच्या ध्वनीने आणि भक्तीरसाने न्हाऊन निघणार आहे.अध्यात्मिक सोहळा रविवारी सायंकाळी ठीक ७:३० वाजता ‘इस्कॉन सेंटर, टेंभूर्णी’ येथून भक्तीमय वातावरणात सुरू होईल. तिथून पुढे मार्गक्रमण करत रात्री ८:३० वाजता माळी गल्ली येथील ‘संत सावता मंगल कार्यालय’ येथे या सोहळ्याचा समारोप होईल
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे उपस्थित भाविकांना अध्यात्मिक विचारांचे अमृत ऐकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. श्रीमान निताई चैतन्य प्रभू यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार असून, श्रीमान रासगोविंददास प्रभू यांचे प्रेरणादायी व अध्यात्मिक प्रवचन होणार आहे
टेंभूर्णी आणि परिसरातील सर्व कृष्णभक्तांनी, नागरिकांनी या मंगलमयी सोहळ्यात सपरिवार उपस्थित राहावे. नामसंकीर्तन आणि अध्यात्मिक प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



