pub-7425537887339079
ब्रेकिंग

राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/ दत्ता देशमुख,दि.2

आज १ मे रोजी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे अध्यक्ष माननीय संजयजी लहाने सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच संस्कार आणि शिस्त यांना महत्त्व द्यावे, असे आवाहन केले. तसेच राज्याच्या विकासात युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे प्राचार्य संजय फलटणकर, तसेच जिजाऊ कॉलेजचे प्राचार्य गजानन वायाळ , जिजाऊ कॉलेजचे प्राचार्य पी.बी.लहाने , अमोल तेलंग्रे, विनोद उबरहांडे, विशाल शिंगणे, भागवत लहाने, विनोद धवलिया, वनिता बोडखे, रोहिणी सोळुंके, सविता बकाल, सुनिता मोरे, स्नेहल रिंढे, अश्विनी दूनगहू, समीना सय्यद, विमल मदन, शंकर सवडे, शंकर मोढेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका समीना सय्यद यांनी केले.शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे