
0
5
3
2
9
4
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.10
उरण तालुक्यातील दिघोडे येथील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना विजेच्या बाबतीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विजेचा व्यवस्थित व अखंडीत पुरवठा नसल्याने नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नेमकी हिच महत्वाची समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोणातून व जनतेला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट )चे उरण विधानसभा अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उरण महिला तालुका अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य कुंदा वैजनाथ ठाकूर यांनी शासन स्तरावर केलेल्या पत्रव्यवहार व पाठपुरावा मुळे सदर समस्या लवकरच मार्गी लागणार आहे.सुनिल तटकरे खासदार रायगड लोकसभा मतदारसंघ तथा प्रांत अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच नामदार कु.अदिती ताई वरदा सुनिल तटकरे ( मंत्री, महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने व सर्व प्रकिया पूर्ण करण्यासाठी विशेष मेहनत घेतल्याने लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे.मध्य विभागातील नागरिकांना तातडीने अंडर केबल साठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी सन्माननीय सुनिल तटकरे ( साहेब ) खासदार रायगड लोकसभा मतदारसंघ तथा प्रांत अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच सन्माननीय नामदार कु.अदिती ताई वरदा सुनिल तटकरे ( मंत्री, महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य ) पाठपुरावा केला जाईल.असे यावेळी वैजनाथ ठाकूर यांनी सांगितले.
दिनांक ९/११/२०२६ रोजी वैभव राजमाने अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्थापत्य उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी रायगड व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय रायगड यांच्या मोजणी आदेशानुसार व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने भूकरमापक यांनी मोजणीचे काम पूर्ण केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर, विकास गायकवाड अतिरिक्त कार्यकारी अभियंता उरण, अमित दुलगन ग्रामपंचायत अधिकारी दिघोडे,समाधान कटेकर धुतुम गाव अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,जयप्रकाश घरत, दिपक नाईक, वैजनाथ ठाकूर, प्रमोद शेळके, विशाल पाटील, आस्मक पाटील, मयूर पाटील, अमित पाटील, नितीन वाणी,राज म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.यांच्या उपस्थितीत मोजणीचे काम पूर्ण झाले.
उरण तालुक्यातील दिघोडे परिसरातील वीज समस्या कायमस्वरूपी दूर व्हावी, नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा आणि वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या त्रासातून ग्रामस्थांची मुक्तता व्हावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वैजनाथ ठाकूर, कुंदा ठाकूर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती. या मागणीला स्थानिक ग्रामस्थांचाही पाठिंबा मिळत आहे.
वीज उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागल्यास दिघोडे व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच २४ तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
लोकहिताच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यास त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो, याचे उदाहरण म्हणून वैजनाथ ठाकूर व कुंदा ठाकूर यांच्या प्रयत्नांकडे पाहिले जात आहे. आता संबंधित वीज वितरण प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करून दिघोडेकरांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अंडर केबल टाकल्यास वेळोवेळी होणारे अपघात टळणार असून अंडर केबल मुळे नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. अंडर केबल मुळे वीज व्यवस्थित अखंडीतपणे सर्वांना मिळेल. तसेच पावसाळ्यात अनेक गावे पाण्याखाली जातात त्यामुळे अशा वारंवार होणाऱ्या घटनेमुळे अंडर केबल उपयुक्त ठरणार आहे.या जनतेच्या कामात कोणीही अडथळा निर्माण करू नये. सदर काम पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
5
3
2
9
4




