टेंभुर्णी चे सुपुत्र, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्राध्यापक गणेश चंदनशिवे यांना प्रोफेसर पदी पदोन्नती, टेंभुर्णी चाल नावलौकिक वाढविला
टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.19
टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील रहिवाशी कसे टेंभुर्णी चे सुपुत्र, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे मुंबई लोककला विभागाच्या प्रोफेसर पदी पदोन्नती मिळाली आहे. नुकतीच मुंबई विद्यापीठाच्या कमिटीची बैठक संपन्न होऊन डॉक्टर गणेश चंदनशिवे यांना प्रोफेसर पदी पदोन्नती देण्याचे मान्य करण्यात आले. त्यांना प्रोफेसर पदी मान्यता मिळाल्यामुळे टेंभुर्णी मध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे. टेंभुर्णीच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला आहे. डॉक्टर गणेश चंदनशिवे यांचे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण टेंभुर्णीच्या नवभारत कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न झाली आहे. त्यांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की मी टेंभुर्णीचे रूम कधीही विसरणार नाही. टेंभुर्णी हे माझे दैवत असून त्या दैवताच्या पायाभरणीवरच मी आज उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी नाट्यकलेचे शिक्षण घेतलेले आहे. तमाशा लोककला या विषयावर त्यांनी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून पीएचडी मिळवलेली आहे. लोककला हा अभ्यास विषय असून तमाशा या लोककला विषयावर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. विविध संशोधन कार्यात त्यांचा पुढाकार असतो. विविध अभ्यास मंडळावर ते सदस्य म्हणून कार्यरत आहे. परदेशात लोककलेचे महत्त्व वाढवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांना लोककलेचा अभ्यास कसा करावा याबद्दल ते शिकवत असतात. त्यांची स्वतंत्र लोक कला बिरादरी असून त्या बिरादरीमार्फत ते लोककलेचे शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात. त्यांना अनेक मानाचे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे. साहित्य क्षेत्रात त्यांची विविध पुस्तके असून विविध साहित्य संमेलना ते अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत. विविध वृत्तवाहिन्यावर त्यांचे मुलाखती प्रसिद्ध झालेल्या असून त्यांच्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर माझ्या कट्ट्यावर त्यांच्या विशेष मुलाखती प्रसिद्ध झालेले आहेत. चित्रपटामध्ये त्यांची गाणी प्रसिद्ध असून स्वतः गायकही आहेत. लोककलेचा बाद असलेले डॉक्टर गणेश चंदनशिवे आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील विविध विद्यापीठातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात पुढाकार घेत असून टेंभुर्णीचे नाव पुढे करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. परदेशातही टेंभुर्णीचा मी कलाकार हे आवर्जून सांगणारे गणेश चंदनशिवे मुंबई विद्यापीठाने प्रोफेसर पदी पदोन्नती दिल्याबद्दल टेंभुर्णीतील मान्यवरांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे. यामध्ये वेद रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे प्रांत उपाध्यक्ष प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर, आदर्श शिक्षक शेख जमीर सर, नवभारत शिक्षण संस्थेचे संचालक विश्वनाथ सांगोळे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष पी.जी तांबेकर, जनार्दन झोरे, नसीम शेख सर, प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या जाफराबाद तालुका अध्यक्ष शेख अशपाक, प्रसिद्ध चित्रकार संतोष बाबुराव औटी, अलकेश सोमानी, संजय राऊत, रावसाहेब अंभोरे, भिकन भैया पठाण, सतीश चंदनशिवे, प्राध्यापक सुनील बनसोडे, प्राध्यापक मधुकर झटे, गौतम मस्के, शेख साबिर, विशाल देशमुख, अमोल देशमुख, कैलास देशमुख, धनराज देशमुख, दिनकर देशमुख, दत्त संस्थानचे अध्यक्ष देवराव देशमुख, बालाजी जोशी, खलसे सर, रघुनाथ उखर्डे, अविनाश देशमाने, किशोर कांबळे, आदींनी अभिनंदन केले आहे.



