pub-7425537887339079
ब्रेकिंग

कुंडलिका नदीवरील पुलाच्या कामामुळे 27 जुलैपासून जड वाहनांना प्रवेशबंदी; 30 सप्टेंबरपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर अनिवार्य मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये आदेश जारी

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.23

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753H वरील कुंडलिका नदी येथे प्रमुख पुलाचे बांधकाम वेगाने सुरू असून या कामादरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्पुरता पर्यायी (डायव्हर्जन) मार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र हा मार्ग केवळ हलक्या वाहनांसाठी सुरक्षित असल्याने 27 जुलै 2026 ते 30 सप्टेंबर 2026 किंवा पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे अगोदर होईल) जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, जालना यांच्या प्रस्तावानुसार जिल्हादंडाधिकाऱ्यांनी मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 115 अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. प्रशासनाने यापूर्वीही जड वाहनांना पर्यायी बायपास मार्गाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र काही जड वाहने अद्यापही तात्पुरत्या मार्गावरून जात असल्याने रस्त्याचे नुकसान होत आहे. तसेच पुलाच्या बांधकामात अडथळे निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित ठिकाणी प्रवेशबंदीचे फलक, बॅरिकेड्स आणि इतर वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने जड व अवजड वाहनांसाठी खालीलप्रमाणे पर्यायी मार्ग निश्चित केला आहे. पर्यायी मार्ग : जालनाकडून मंठा चौफुलीकडे जाणारी जड वाहतूक : अंबड चौफुली – कालिका स्टील चौफुली – कन्हैया नगर चौफुली – मंठा चौफुली. मंठ्याकडून जालन्याकडे (अंबड चौफुलीकडे) जाणारी जड वाहतूक : मंठा चौफुली – कन्हैया नगर चौफुली – कालिका स्टील चौफुली – अंबड चौफुली. जिल्हा प्रशासनाने सर्व जड व अवजड वाहनचालकांनी निर्धारित पर्यायी मार्गाचाच वापर करावा, असे आवाहन केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलीस कायदा, 1951 च्या कलम 139 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे