pub-7425537887339079
ब्रेकिंग

शंभर टक्के उपस्थितीबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक: ‘द न्यू इकराटेक्नो इंग्लिश स्कूल’चा उपक्रम;

टेंभुर्णी गावासह नातेवाईकांकडून कौतुकाचा वर्षाव

0 4 8 6 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8

‘द न्यू इकराटेक्नो इंग्लिश स्कूल (P.L.T)’ मध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मधील ऑगस्ट २०२६ या महिन्यात उत्कृष्ट उपस्थिती दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थिनी खान मुबशिरा (Khan Mubashira) आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शाळेत शिक्षण घेणारी, माजी उपसरपंच फैजल चाऊस यांची मुलगी मरियम फैसल चाऊस (Maryam Faisal Chaus) यांनी ऑगस्ट २०२६ या महिन्यात १००% उपस्थिती (100% Attendance) नोंदवून ‘A+’ ग्रेड पटकावला आहे.
या दोन्ही विद्यार्थिनींनी दाखवलेली अभ्यासातील चिकाटी, नियमितता आणि शिस्त याबद्दल शाळा प्रशासनाकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये नियमित शाळेत येण्याची सवय लागावी आणि अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेच्या ‘अकॅडमिक एक्सलन्स ट्रॅकर’ (Academic Excellence Tracker) अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला होता.
टेंभुर्णी गावात आनंदाचे वातावरण:
मरियम फैसल चाऊस हिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे मूळ गाव टेंभुर्णी येथील माजी उपसरपंच फैसल चाऊस यांची मुलगी आहे (तालुका जाफराबाद, जिल्हा जालना) येथे आनंदाचे वातावरण पसरले आहे. तिच्या या चमकदार कामगिरीबद्दल टीपूरणी गावातील सर्व नातेवाईक, कुटुंबिय आणि ग्रामस्थांनी तिच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन तिचे व तिच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले व भरभरून कौतुक केले.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि टीपूरणी ग्रामस्थांनी खान मुबशिरा व मरियम फैसल चाऊस यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी उज्वल शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 6 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे