pub-7425537887339079
ब्रेकिंग

जाफ्राबाद तालुक्यात झेडपी शाळा ओस, शिक्षणासाठी शाळा समितीच्या बैठकीत डिजिटल शिक्षणाचा निर्णय

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21

जाफ्राबाद तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती सध्या अत्यंत चिंताजनक बनली आहे. एकीकडे शाळेत शिक्षकांची संख्या पुरेशी असली, तरी विद्यार्थ्यांची पटसंख्या मात्र वेगाने घटत आहे. प्रशासनाची अनास्था, राजकीय वरदहस्ताने फोफावलेल्या खाजगी इंग्रजी शाळा आणि पालकांची उदासीनता यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे. खाजगी इंग्रजी शाळांनी पाचवीच्या प्रवेशासाठी आक्रमक मोहीम राबवत झेडपी शाळेतील हुशार विद्याथ्यांना शिष्यवृत्ती, मोफत गणवेश आणि बससेवेची आमिषे दाखवून आपल्याकडे खेचण्याचा सपाटा लावला आहे. यात शिक्षण ——————————चौकट :- सर्वांनी एकत्र येण्याची गरज “झेडपी शाळा बंद पडली तर गावाचे भविष्य अंधारात जाईल. आता तरी प्रशासन, शिक्षक आणि पालकांनी एकत्र येऊन झेडपी शाळा वाचवली पाहिजे. शिक्षकांनी दर्जा वाढवला तरच स्पर्धेत टिकण्याची क्षमता निर्माण होईल.” – रेखा जमधडे, सदस्य, शालेय समिती   हक्क कायद्याचे उघडपणे उल्लंघन होत असले तरी प्रशासनाने सोयीस्कर डोळेझाक केली आहे. पूर्वीच्या काळी विद्यार्थी होते पण बसायला वर्गखोल्या नव्हत्या, आता मात्र सुसज्ज इमारती आणि शिक्षक असूनही विद्यार्थी नाहीत, अशी विदारक स्थिती आहे. याला जबाबदार कोण, याचे आत्मचिंतन शिक्षण विभागाने करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, राजकीय छत्रछायेखाली गल्लीबोळात खाजगी शाळांचे पेव फुटले असून, शिक्षण अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यावर कारवाई करण्याऐवजी आपली जबाबदारी झटकत आहेत. फुकट म्हणजे निकृष्ट असा गैरसमज करून घेतलेले पालकही स्वतः झेडपी शाळेत शिकून मोठे झालेले असतानाही, आपल्या पाल्यांना भरभक्कम फी देऊन खाजगी शाळेत पाठवण्यास प्राधान्य देत आहेत. याच पार्श्वभूमीवर २० जून रोजी टेंभुर्णी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शाळेतील विद्यार्थ्यांची घटती संख्या हा या बैठकीतील मुख्य चर्चेचा

_________________________________________

विशेष लक्ष देणे गरजेचे “खाजगी शैक्षणिक संस्था स्पर्धेत बलाढ्य आहेत, त्यामुळे झेडपी शाळेत गोरगरिबांची मुले शिकतात. जिल्हा परिषद शाळेतील आळशी प्रवृत्ती बाजूला सारून शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष द्यावे.” – गौतम चंदनशिवे, सदस्य, शालेय समिती ___________________ विषय होता. यावर उपाय म्हणून प्रत्येक वर्गखोलीत टीव्ही संच बसवून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी सर्वानुमते पुढाकार घेण्यात आला. शिक्षकांनी आपल्या शिकवण्याचा दर्जा उंचावावा आणि पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करावा, यासाठी समितीच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याची हमी देण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, गौतम चंदनशिवे, रावसाहेब अंभोरे, रेखा जमधडे, प्रणिती आव्हाळे, दशरथ खरात, कुरेशी मॅडम, सतीश खरात, मंगलाताई साने, अशोक हरकळ आणि आनंदा माने यांची उपस्थिती होती. तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये तीन शिक्षक कार्यरत असतानाही पटसंख्या अवघ्या १५ ते २० वर येऊन ठेपली आहे. शासनाचा दरमहा लाखो रुपयांचा निधी शिक्षकांच्या पगारावर खर्च होत असूनही शाळांचे वर्ग मात्र रिकामेच दिसत आहेत. शासनाने आणि शिक्षण भागाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे