टेंभुर्णी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी अविनाश राठोड कैलास भारती यांची भोकरदन येथे बदली.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.1
जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी हे गावं सगळ्यात मोठे गाव मोठी बाजार पेठ आहे. येथील राजकारणाचा तालुक्यावर आणि थेट जिल्हावर अतिसंवेदनशील म्हणून ओळख थेट परिणाम होत असतो.या मुळे येथील ठाणे प्रमुख यांची भूमिका खूप महत्वाची असते. बदली ही प्रशासकीय बाब असून टेंभूर्णी पोलीस स्टेशन प्रमुख श्री सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) कैलास भारती यांची बदली भोकरदन येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बदनापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सपोनि अविनाश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. टेंभूर्णी पोलीस ठाण्याची हद्द ही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कायमच चर्चेत राहिली आह. त्यामुळे या पोलीस ठाण्याच्या प्रमुख पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपुढे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान नेहमी असते. अशा परिस्थितीत नव्याने रुजू झालेले सपोनि अविनाश राठोड यांच्याकडे नागरिकांच्या अपेक्षा आहे.गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा, सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करणे या बाबी त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख कसोटी ठरणार आहेत. टेंभूर्णी परिसरातील अनेक नागरिकांनी नव्या अधिकाऱ्यांकडून धाडसी आणि परिणामकारक कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. विशेषतः अवैध धंद्यांचे जाळे मोडून काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. टेंभूर्णी पोलीस ठाण्याच्या नेतृत्वात झालेल्या या बदलामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. चौकट. बदलून गेलेले कैलास भारती आणि टेंभुर्णीकरांचा तसा संवाद कमीच राहिला. त्यांनी कधी शांतता कमिटीची बैठक घेण्याचे कष्ट घेतले नाही. जास्त परिचय केला नाही होऊ दिला नाही.आता पुढे निवडणूक आहे. गावात बऱ्याच समस्या आहे. शिवाजी नगर येथे कधीच कोणतेच वाहन शिस्तीत लागले नाही.गावात मोठ्या प्रमाणात लहान मुले गाडी चालविताना वेग कमी ठेवत नाही.थोडक्यात पोलिस यांचा कमी झालेला धाक निर्माण करण्याचे काम आणि जवाबदारी नवीन आलेले अविनाश राठोड यांच्यावर आलेली असून ते या कडे कसे बघतात हे पाहावे लागेल.




