pub-7425537887339079
ब्रेकिंग

लोणचे तयार करण्यात महिला मग्न ; ग्रामीण भागात घरगुती लोणच्याला मागणी

घरगुती लोणचे तयार करण्यासाठी कैऱ्या फोडून लोणचे भरताना दांपत्य.

0 4 7 5 0 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 12

चविष्ट आंबट आंब्यांपासून लोणचे तयार करण्याची ग्रामीण भागात जुनी परंपरा असून सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर लोणचे तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदा गावरान आंबा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने लोणच्याची चवही वाढणार आहे. ग्रामीण भागातील महिलांकडून वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याचे लोणचे तयार केले जातात. मोहरी,तिळ , जवस, कऱ्हाळे अशा धान्यापासून लोणचे तयार केले जातात यामध्ये लवंग मिरे हळद मीठ कळाची मेथी अशा प्रकारचे विविध मसाल्याचे पदार्थ यासाठी वापरले जातात. लोणच्यासाठी शक्यतो आंबट चव असलेल्या आंब्याचा वापर केला जातो. सद्यस्थितीत ग्रामीण भागात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर लोणच्याचा आंबा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. पन्नास रुपये ते दोनशे रुपये किलो पर्यंत आंब्याचे दर आहेत. विशेष म्हणजे आंबा फोडण्यासाठी काही ठराविक मंडळी कडून काम केले जाते. कैऱ्यांची बारीक तुकडे करून व्यवस्थित रित्या लोणच्याचा मसाला भरणीत भरला जातो. वर्षभर शेतकरी वर्गाकडून या लोणच्याचा आस्वाद घेतला जातो. कैऱ्या फोडण्याचा वीस रुपये किलो दर लोणच्यासाठी कैऱ्या फोडण्याचा हातखंडा असलेल्या मंडळी कडून वीस रुपये किलो प्रमाणे उडण्याची मजुरी घेतली जाते. तर काही शेतकरी घरीच कैऱ्या फोडून लोणचे तयार करतात. लोणच्यासाठी झाडांच्या कैऱ्या अलगद खोडी झेल्याद्वारे काढल्या जातात. ताज्या कैऱ्याचा वापर यासाठी करावा लागतो यामुळे व्यापाऱ्यांकडून दररोज पाहिजे तेवढ्याच कैऱ्या झाडावरून काढल्या जातात. याशिवाय ग्रामीण भागातील अनेक जण लोणच्याचा आंबा तयार असल्याचे सांगत झाडाखालीच विक्री करतात.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 5 0 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे