भारतीय सैनिक लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला उपक्रमाचे त्रिमूर्ती इंग्लिश स्कूल मोहपुरी येथे यशस्वी आयोजन

अनिल भालेकर/ अंबड,दि.3
मोहपुरी स्थित त्रिमूर्ती इंग्लिश स्कूल मध्ये सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते.याच अनुषंगाने भारतीय सैन्य दलात कार्यरत व लेखक अमोल करे यांचे मार्गदर्शन शिबिर शाळेमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाले.
मुसंडी या कादंबरीचे लेखक व भारतीय सैन्य दलामध्ये कर्तव्य बजावणारे अमोल करे सध्या सुट्टीच्या कालावधीमध्ये गावी आले आहेत. या सुवर्णसंधीचा लाभ घेत त्रिमूर्ती इंग्लिश स्कूल मध्ये अमोल करे यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.
आपल्या आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेतल्यास नक्कीच यश मिळते या अमूल्य संदेश देण्याबरोबरच अनेक पुस्तकांचे वाचन आपल्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडू शकतो असा अमूल्य संदेश त्यांनी या मार्गदर्शन शिबिर प्रसंगी दिला.
भारतीय सैन्य दलात दाखल झाल्यापासूनचा त्यांचा प्रवास विद्यार्थ्यांनी अत्यंत मंत्रमुग्ध होत श्रवण केला.त्यांची यशोगाथेला टाळ्यांच्या जोरदार प्रतिसाद उपस्थित विद्यार्थी व शिक्षक वृंदांनी दिला. मुसंडी या पुस्तकातून विद्यार्थ्यांना व तरुणांना नक्कीच प्रेरणा प्रदान होईल यासाठी पुस्तकाचे लिखाण केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
याप्रसंगी प्राचार्य बी.आर डोंगरे, उपप्राचार्य सौ. कल्पना गिरी विचारवंत नाटकर व्ही.एल यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या बालमनावर रुजवणारे अमूल्य मार्गदर्शन करणाऱ्या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल पालक वर्गातून शाळेचे विशेष अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

