महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे ६५ वे राज्यस्तरीय अधिवेशन पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथे दोन दिवस उत्साहात पार पडले. राज्यातील विविध जिल्ह्यांतील मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नांवर व्यापक विचारमंथन करण्यात आले. अधिवेशनाचे अध्यक्षस्थान कोल्हापूरचे डॉ. बी. बी. पाटील यांनी भूषविले.या अधिवेशन मध्ये उरण तालुक्याचे सुपुत्र तथा जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट शाळा मोराचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांना शिक्षण क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार २०२६ ने गौरविण्यात आले.
या पुरस्कार सोहळा प्रसंगी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार निरंजन डावखरे, आमदार हरिश्चंद्र भोये, शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे, स्वागताध्यक्ष तथा तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष व प्रगती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. के. राजपूत, पालघर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष दीपक पवार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संभाजी भोजने, चंदूलाल घरत आणि संजय पाटील उपस्थित होते. या अधिवेशनात रायगडचे व्हि. व्हि. पाटील, के. डी. म्हात्रे, किशोर भोईर, उत्तेकर सर, मगर सर, मार्गे सर, वळवी मॅडम, राज्य महामंडळाचे पदाधिकारी यांचीही विशेष उपस्थिती यावेळी होती. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुख्याध्यापकांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी उरण तालुक्याचे सुपुत्र आदर्श मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.पुरस्कार मिळाल्या बद्दल जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचे संस्थापक जे एम म्हात्रे, युवा नेते प्रितम म्हात्रे, चेअरमन परशुराम कोळी, चंद्रकांत कोळी यांनी व संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी तसेच शिक्षण विभाग पंचायत समिती, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.विद्यार्थीनिष्ठ, शिक्षण प्रेमी, कर्तव्यनिष्ठ असलेले आदर्श मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
दिव्यांगांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी राज्यव्यापी लढाई साठी नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालय येथे दि. २५ नोव्हेंबर पासून बे मुध्दत धरने आंदोलनात सहभागी व्हा चंपतराव डाकोरे पाटिल
1 hour ago
अत्याचार पीडित मृत व्यक्तीच्या पात्र वारसांना शासकीय/निमशासकीय सेवेत नोकरीसाठी 20 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
1 hour ago
जनगणना 2027 चे वेळापत्रक जाहीर; 10 जानेवारीपासून स्व-गणनेची सुविधा
1 hour ago
जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांची रेवगाव येथे क्षेत्रभेट; विविध उपक्रमांची पाहणी व ग्रामस्थांशी संवाद
2 hours ago
शिक्षणमहर्षी नरसू पाटील यांच्या हस्ते ‘रायगड संदेश’च्या सातव्या दिवाळी अंकाचे दिमाखदार प्रकाशन!
2 hours ago
तोगरे दांपत्य तर्फे औषधे दान. समाजापुढे उभा केला नवा आदर्श.