pub-7425537887339079
ब्रेकिंग

१० वर्षाच्या बालिकेवरील अत्याचारप्रकरणी वृध्द नराधमास 20 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.23

दहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी बिसन उर्फ भिसन रायसिंग ढवळे यास जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. तसेच ५० हजारांचा दंडही भरण्याचे आदेश दिले आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, कृपेश मोरे यांनी आरोपी बिसन उर्फ भिसन रायसिंग ढवळे, वय ८१ वर्ष, रा. सावरगाव ता. जाफ्राबाद यास कलम ६५ (२) व कलम ४,६,८,१०, १२ बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा २०१२ यानुसार गुन्हा सिध्द झाल्यामुळे आरोपी यांस वीस वर्षे सक्त मजुरी, ५०,०००/- रूपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात महाराष्ट्र शासनाकडून पिडीतेस रूपये ३,००,०००/- भरपाई देण्याचा आदेश मा. विशेष न्यायालयाने दिलेला आहे. सदर प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता वर्षा लक्ष्मीकांत मुकीम यांनी काम पाहिले. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, या प्रकरणातील पिडीत मुलगी दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गावातील महादेव मंदिराकडे खेळण्यासाठी जात होती. आरोपी बिसन उर्फ भिसन रायसिंग ढवळे याने तिला आवाज देवून थांबविले. तिचा हात धरला व माझ्या घरात चल असे म्हणाला, ती नाही म्हणत असतांना तिला जबरदस्तीने त्याच्या घरात तो घेवून गेला व त्याने घराची कडी लावून घेतली त्यानंतर त्याने त्याचे व पिडीतेचे बळजबरीने कपडे काढले व तिच्यावर गंभीर भेदक लैंगिक हल्ला केला. पिडीतेला त्रास झाल्याने ती जोरात ओरडली, त्यामुळे त्या ठिकाणी आजुबाजूचे तीन शेजारी आले. त्यांनी त्या घराचा दरवाजा वाजविला, त्यानंतर आरोपीने घराचा दरवाजा उघडला. शेजारी राजु याने पिडीतेला घराबाहेर काढले व घरी जाण्यास सांगितले. आई कामावरून घरी आल्यावर पिडीतेने तिला व गावात राहणा-या आजीला सर्व हकीकत सांगितली त्यानंतर पिडीता आजीसोबत पोस्टे टेंभूर्णी येथे गेली. पिडीतेच्या तक्रारीवरून आरोपी विरूध्द पोलीस ठाणे अंमलदार बी. एस. खार्डे यांनी महिला सहा. पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी नोंदविलेल्या पिडीतेच्या जबाबाप्रमाणे गुन्हा दाखल केला. या फिर्यादीवरून तपासीक अंमलदार के. बी. भारती यांनी गुन्हयाचा संपूर्ण तपास करून आरोपी विरूध्द दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात आरोपी विरूध्द दोषारोप निश्चित केल्यानंतर सरकार पक्षातर्फ एकुण दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पिडीत मुलगी, तिची आजी, पंच साक्षीदार बिलकिस शेख अब्दूल रहिम, डॉ. भाग्यश्री काशिद, डॉ. विठ्ठठल देशमुख, डॉ. अजहरूधिन, मुख्याध्यापक गोविंद जाधव व तपासीक अंमलदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. ___________________चौकट :- पिडीतेस ३ लाखांच्या भरपाईचे आदेश न्यायालयाने सरकारपक्षातर्फे दिलेला पुरावा व युक्तीवाद लक्षात घेवून आरोपीला कलम ६५(२) भारतीय न्याय संहिता २०२३ व कलम ४, ६, ८, १०, १२ बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा २०१२ यानुसार गुन्हा सिध्द झाल्यामुळे आरोपी बिसन उर्फ भिसन रायसिंग ढवळे यांस वीस वर्षे सक्त मजुरी, ५०,०००/-रूपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आणि दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणुन पिडीत मुलीस देण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे प्रकरणात महाराष्ट्र शासनाकडून पिडीतेस रूपये ३,००,०००/- भरपाई देण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिलेला आहे. या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे साक्षीपुरावा सुरू झाल्यानंतर तीन तारखांमध्ये सर्व महत्वाच्या साक्षीदारांची साक्षीपुरावा नोंदवून प्रकरण जलदगतीने चालविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे