pub-7425537887339079
ब्रेकिंग

काल्याच्या प्रसादाने सप्ताहाची सांगता टेंभुर्णीतील राम जन्मोत्सवाला 48 वर्षाची परंपरा

टेभुर्णी येथील पुरातन श्री राम मंदिरातील आकर्षक श्रीराम लक्ष्मण व सीता मातेची मूर्ती

0 4 0 5 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.29

टेंभुर्णी, रामनवमीच्या निमित्ताने येथील श्रीराम मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शुक्रवारी काल्याच्या कीर्तनाने झाली. सात दिवस सुरू असलेल्या या खंड हरिनाम सप्ताह मध्ये मोठ्या प्रमाणे भाविकांनी सहभाग नोंदविला दरम्यान गुरुवारी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती प्रभू रामचंद्र लक्ष्मण व सीता यांच्या मुर्त्यांनाही सजावट केली होती. सायंकाळी पाच वाजता गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान शुक्रवारी सकाळी बाळासाहेब नाईक महाराज यांचे काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. कीर्तनानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
दरम्यान गुरुवारी रात्री बजरंग दलाच्यावतीने श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने भव्य मिरवणुकी समोर अघोरी बाबांचे देखावे साजरे करण्यात आले होते हे देखावे पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे