राजुरा ता. मुखेड येथे दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजुरा परिसरातील दिव्यांगाची बैठक संपन्न

नांदेड/प्रतिनिधी,दि.31
दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग बांधवांची महत्वपूर्ण अनेक विषयावर बैठक संपन्न झाली
मा. जिल्हाधिकारी नांदेड दिव्यांगाच्या अनेक प्रश्नाबाबत
१२ बैठका, १ सुनावणी तरी प्रश्न ‘जैसे थे’; निष्काळजी अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई अन् दिव्यांग कायद्यानुसार कारवाई करण्याची चंपतराव डाकोरे पाटील यांची आक्रमक मागणी
तसेच या बैठकित दिव्यांगांच्या पप्रशासकीय छळाविरुद्ध नांदेड
जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक याना निवेदन देऊन त्यातील निवेदनातील १५ दिवसात लेखि ऊतर नाही दिल्यास ग्रामपंचायत येथे तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने निर्ण घेण्यात आला.
दिव्यांगाना खालिल सवलती, प्रश्नाचे तात्काळ माहितीसाठी पंधरा दिवसात लेखि ऊतर द्या ? *मागन्या*
१) दिव्यांग कायदा २०१६ ची माहिती दिव्यांगाना व्हावी म्हणून किती वेळा ग्रामसभा किंव्हा दिव्यांगा संदर्भात बैठक घेतली ती माहिती रजिस्टर कॉपिसह माहिती देणे.
२) ग्रामपंचायत कार्यालय येथे दिव्यांग सर्टिफिकेट नंबर, मो. न.नोंद रजिस्टरची माहिती देणे.
३) ग्रामपंचायतचा राखिव दिव्याग पाच टक्के निधी इ. स. २०१६ ते आजपर्यंत किती वेळा वाटप केला? ते लाभार्थी, सहि, वस्तु, रक्कम,मो.न. रजिस्टरसह माहिती त्वरीत मिळणे देणे, माहिती देता येत नसेल तर ते कारणासहित माहिती देणे.
४) दिव्यांगाना व्यवसाय करण्यासाठी शासकीय जागा २०० फुट किंव्हा गाळे किती दिव्यांगाना दिली ती माहिती देणे.
५) दिव्यांगाना रो. ह. योजनेत काम देता येत नसेल तर शंभर दिवसाचा भत्ता किती दिव्यांगाना मिळाला माहिती देणे
६) किती दिव्यांगाना घरकुल दिले, घरकुल बदल किती दिव्यांगाची पंचायत समिती कडे प्रस्ताव पाठविला किंव्हा योजनेत नाव समाविष्ठ करण्यासाठी दिव्यांग बैठक घेतली काय माहिती देणे.
७) शासनाच्या अनेक विभागाच्या योजनेमध्ये दिव्यांगाना पाच टक्के राखीव असलेल्या आरक्षणातून किती दिव्यांगाना लाभ मिळाला त्या़ची माहिती देणे.
८) दिव्यांगाना व्यंगावर बोलणे, त्यांना मानसिक, शारिरीक त्रास, घरावर, शेतीवर अतिक्रमण केल्यास दिव्यांग कायदा २०१६ कलम ९२ ची माहिती दिली काय? किती दिव्यांगावर असा प्रसंगामुळे गुन्हा नोंद केला काय? माहिती देणे.
९) ज्या दिव्यांगाना मतदान करण्यासाठी बूथवर जाता येत नसेल अशा दिव्यांगाना घरोघरी बुथ केंद्राबाहेर माहिती दिली काय व किती दिव्यांगाना मतदान घरोघरी ची नोंद केली ती माहिती त्वरित देणे वरील माहिती
१५ दिवसांत समाधानकारक लेखी उत्तर आणि कृती न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता थेट जिल्हाधिकारी दालनात स्वेच्छामरणाच्या परवानगीसाठी ग्रामपंचायत कार्यालय येथे बे. मुध्दत धरणे आंदोलनाचा ईशारा चे निवेदन गावागावातून देण्यात यावे असे डाकोरे यांनी बैठकित सांगितले या शाखेची पाच वर्ष पदाधिकारी यांची निवड करण्यात आली
या. बैठकित ता. अध्यक्ष मगदूम शेख ऊंद्रिकर,हेंमत पाटील, सचिन राजुरे प्रमोद इंगळे,गोपाळ राजुरा, राम राजुरे, सुधाकर जाधव, नामदेव वाघमारे, तुळसा गंगाधर, नेहा भंडारे, मारोती वाघमारे ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते




