pub-7425537887339079
ब्रेकिंग

“व्यक्तिचित्रणाचे तपस्वी केशवजी मोरे सर”चित्रकार संतोष औटी

0 5 3 8 4 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.16

नाशिक येथील सुप्रसिद्ध चित्रकार व्यक्तिचित्रण म्हणजेच (पोट्रेट )केशव मोरे सर, यांच्या विषयी यशवंत कला महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे, मी इ.स.2000 मध्ये पायाभूत वर्ग म्हणजेच (फाउंडेशन) या वर्गात होतो आणि त्या काळात पेंटिंगच्या शेवटच्या वर्गात जायचे म्हणजे एक भीती वाटायची जी डी आर्ट फायनल इयर मुलांच्या वर्गात जायचं म्हणजे त्यांना वर्गात येऊ का असं अशी परवानगी घेऊन आत जावे लागे , मग त्यामुळे आम्हाला भीती वाटायची त्यांच्या वर्गात जायची मग एक योग असा आला की केशव मोरे सरांचे व्यक्तिचित्रण या विषयाचे प्रात्यक्षिक ठेवले होते , मग आम्हाला आनंद झाला चला आता फायनल इयर च्या वर्गात आज आपण व्यक्ती चित्र म्हणजेच (पोट्रेट) या विषयाचे प्रात्यक्षिक बघणार आहोत,आणि माझे गुरु तोरवणे सर यांनी आम्हाला प्रात्यक्षिक बघण्यासाठी पेंटिंग फायनल इयर च्या क्लास मध्ये नेले होते त्यावेळेस केशव मोरे सरांची एक वेशभूषा म्हणजे शम्मी कपूर सारखेच दिसायला, आणि दुसरे म्हणजे सरांची व्यक्तिचित्र याचे प्रात्यक्षिक देत असताना सरांचा रंगा विषयी अभ्यास तपस्या एक तप त्यांच्या रंगातून दिसून येत होते, त्यावेळेस भांबरे सरांना त्यांचे व्यक्तिचित्रणास मॉडल म्हणून समोर बसवले होते, आजही सरांविषयी ते प्रसंग आठवतात, तोरवणे सरांनी आम्हाला केशव मोरे सरांच्या घरी म्हणजे नाशिकला घेऊन गेले असता सरांच्या घरी एक चित्र बघायला मिळाले ते म्हणजे बुलेटवर बसलेला निग्रो व्यक्ती हे चित्र त्यांचं पाहायला मिळालं, असे बरेचसे चित्र त्यांच्या घरात होते, सरांच्या घरी गेला असता त्यांची पूजा वगैरे आध्यात्मिकता या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या, सरांचं चित्रावर रंगलेपणाचा एक वेगळा अनुभव बघायला मिळाला सरांच्या चित्रात रंगांमध्ये थरावर असायचे म्हणजे एक प्रकारे जाडी असायची, आणि ते व्यक्तिचित्र बघत असताना जवळून एवढं ओबडधोबड वाटायचं आणि दुरून बघितल्यावर ते रंग सगळे एकत्र होऊन जायचे मग आम्हाला कळायचं की सरांच्या रंगांमध्ये जादू, सरांना बऱ्याच ठिकाणाहून प्रात्यक्षिक देण्यासाठी बोलवण्यात येत होते, सरांचे शिक्षण जी डी आर्ट मुंबई येथे जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये झाले, सरांना बऱ्याच ठिकाणी मानसन्मान पुरस्कार मिळाले, मोरे सरांनी वीस वर्ष शासकीय कला महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सेवा दिली, सरांचे गुरु महाले सर यांच्या घरी सुद्धा जाण्याचा योग आला म्हणजे एक प्रकारे ऋषीमुनी चित्रकलेचे आम्हाला त्या काळात भेटले त्या काळात व्यक्तीचित्रणाबद्दल एवढं काही कळत नव्हता मनाला पण फार आनंद वाटायचा, त्या काळात मला सरांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता तो एक आनंदाचा भाग होता ती आठवण अजूनही एका फोटोच्या रूपात माझ्या जवळ आहे, आता इंटरनेटच्या फेसबुकच्या माध्यमातून सरांशी माझी मैत्री झाली होती, मी कोरोनाच्या काळात दोन वर्ष बरेचशे चित्र काढली त्यामध्ये विठ्ठलाची वारी बंद झाली होती म्हणजे शेतकरी हा वारीला जाऊ शकत नव्हता त्या काळात मी चित्राच्या माध्यमातून पेन या माध्यमातून विठ्ठलावर बरेचसे प्रसंग रेखाटले त्यात रेखाटलेल्या काही चित्रांना सरांची लाईक मिळायची फार आनंद वाटायचा की आपल्याला कुठेतरी न्याय मिळाला आपल्या रेषेला मनस्वी खूप आनंद व्हायचा, आता काल-परवा दोन-चार दिवस आधी सरांचे फेसबुकला काही फोटो बघायला मिळाले विदेशातील मनाला आनंद वाटला आणि अचानक काल सरांची दुःखद घटना घडल्याची बातमी ऐकून मन स्तब्ध झाले आणि निशब्द झाले, माझ्या गुरूंचे गुरु केशव मोरे सर एक प्रकारे ऋषी रंगांच्या दुनियेतले या ठिकाणी म्हणायला हरकत नाही, अशा ऋषीमुनींच्या आपल्या जीवनावर आशीर्वाद असणं फार मोलाच आहे एक प्रकारे देव माणूस होते, गुरूंचे गुरु
केशव मोरे सर यांना चित्रकार संतोष औटी यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 8 4 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे