pub-7425537887339079
ब्रेकिंग

‘हर घर तिरंगा’ मोहिमेतंर्गत वंदे मातरम् समूह गायन व योग प्रात्यक्षिकाचे आयोजन

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.12

 ‘हर घर तिरंगा’ मोहिमेतंर्गत देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रप्रेम तसेच नागरिकांमध्ये आरोग्य व योगाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘वंदे मातरम्’ समूह गायन व ‘योगा फॉर हेल्थ’ योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 8.00 ते 9.00 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमामध्ये ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन तसेच ‘योगा फॉर हेल्थ’ अंतर्गत विविध योगासने व योग प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिक, विद्यार्थी व युवकांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासोबतच नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, खेळाडू, अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे