pub-7425537887339079
ब्रेकिंग

सिद्धार्थ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘१८ तास अखंड वाचन’ उपक्रमाचे आयोजन

0 4 1 1 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.11

जाफराबाद येथिल सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून ‘१८ तास अखंड पुस्तक वाचन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राहुलजी म्हस्के म्हस्के यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी प्राचार्य डॉ राहुलजी म्हस्के म्हणाले की,बाबासाहेबांच्या अफाट व्यासंग आणि अभ्यासू वृत्तीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.विद्यार्थी आणि संशोधकांनी सलग १८ तास एकाग्रतेने विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करावे,या निमित्ताने महाविद्यालयाच्या ऐतिहासिक ग्रंथालयातील बाबासाहेबांच्या हस्तलिखितांचे आणि दुर्मिळ ग्रंथांचे दर्शन घेण्याची संधी उपस्थितांना मिळेल. या उपक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्रा.अशोक पठाडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथालय समितीने आणि विभागाने केले होते. सूत्रसंचालन डॉ संतोष पहारे यांनी केले तर आभार प्रा. मनीष बनकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्रसिद्ध प्रमुख प्रा अनिल वैद्य यांचीही उपस्थिती होती.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 1 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे