महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.18
जाफराबाद,येथे महाराणा प्रतापसिंह यांची जयंती जाफराबाद येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. तर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विजयनाना परिहार, शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, नगरसेवक सुरेश दिवटे, माजी नगराध्यक्ष संजय लहाने, नायब तहसीलदार मिसाळ, पोलीस निरीक्षक सतीश जाधव, नगराध्यक्ष दीपक वाकडे, दिलीपसिंह गौतम आदी मान्यवरांनी भाषण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयनाना परिहार यांनी अध्यक्षीय मनोगतात महाराणा प्रताप यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी सुरेश गवळी, सुधीर पाटील, नगरसेवक अनिल बोर्डे, रविराज जयस्वाल, रमेश धवलिया, भगवानसिंह इंगळे, प्रकाशराव मिरगे, मोहन मुळे, मुकेश भारद्वाज, प्रवीण बडजावत, दामू वैद्य, सुरेश वाकडे, रवि हिवाळे, संदीप वाकडे, संजयसिंह गौतम, किशोरसिंग बायस, दुर्गेशसिंग कच्छवा, मनोज बायस, मुजीब, बबनसिंग बायस, राजेंद्रसिंह गौतम, अमोल पडघन, अॅड. विष्णू शिंदे, गव्हाणे, ज्ञानेश्वर शिंदे, गजबसिंग घुसिंगे, गजेंद्रसिंह कछवा, देविसिंग बायस, संजय खंडेलवाल, योगेश नगरिया, राजू ताटू, अर्जुन खंडेलवाल, कृष्णा दुनगहू, संतोषसिंह बायस, प्रकाश कछवा, मयूर बायस, इश्वर परिहार, सुभाष लोळगे, अनिल मुळे, केदार गौतम, विजय बिसेन, प्रमोद राजपूत, दीपक ठाकूर, बाला गौतम, गगन ठाकूर, सौगन बिसेन, कुलदीप बायस, आकाश कछवा, प्रणव गौतम, गोपाल ढाकीफळे, अनिरुद्ध मुळे, सचिन बायस, पंढरी परिहार, योगेश वाकडे, सोनू कछवा, बबलू जोडीवाले आदींसह समाजबांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन चेतन बायस यांनी केले. संदीप सोळंके यांनी आभार मानले.



