मिक्स बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने ७ वी जिल्हास्तरीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धा अलिबाग येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून अनेक संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत कौशल्य, शिस्त आणि जिद्दीचे दर्शन घडवले.या स्पर्धेत विजय विकास सामाजिक संस्थेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत दोन प्रमुख पारितोषिकांसह सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली.
सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंमध्ये आसिफ खान, शिवांश सिंग, रेयांश पाटील, मेहबूब खान, श्लोक पाटील, झारा पटेल, जागृती घरत, सोहेल पटेल, नियान ठाकूर, हर्नल पाटील, जीत घरत, प्रीत घरत, ऋत्विक ठाकूर, प्रभास राजन्या आणि भक्ती भोईर यांचा समावेश आहे.
रौप्यपदक चैतन्य स्वर, आयुष घरत, युग घरत, कुशल म्हात्रे आणि आशुतोष शेट्टी यांनी पटकावले.
तर एस. आर. विधू आणि मुस्कान खान यांनी कांस्यपदक मिळवत संस्थेच्या यशात भर घातली.
या सर्व खेळाडूंना विकास भोईर सर, दीपक घरत सर, प्रगती भोईर घरत मॅडम आणि अथर्व घरत सर यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले.
खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशामुळे विजय विकास सामाजिक संस्थेचा नावलौकिक वाढला असून, त्यांच्या मेहनतीचे, शिस्तीचे, जिद्दीचे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे हे फलित आहे. या यशाबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.