pub-7425537887339079
ब्रेकिंग

ट्रकची विद्युत वाहिनीच्या खांबाला धडक

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.23

जाफराबाद-जालना मुख्य रस्त्यावरील गणेशपूर फाटा येथे बुधवारी भरधाव ट्रकने रस्त्यालगत असलेल्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या खांबाला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती. नियम धाब्यावर बसवून अत्यंत धोकादायक पद्धतीने उभारण्यात आलेल्या या विद्युत वाहिनीमुळे भविष्यात वाहनांचे मोठे अपघात होऊन मोठा अनर्थ घडण्याची भीती ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. जाफराबाद तालुक्यातील अकोला देव तांडा येथे पन्नास एकरांवर नवीन सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पातून टेंभुर्णी सबस्टेशन साठी नेण्यात येणारी विद्युत वाहिनी अतिशय निष्काळजीपणे जाफराबाद-जालना मुख्य रस्त्याच्या अगदी जवळून नेण्यात आल्याचा आरोप आहे. या कामासाठी अत्यंत धोकादायकरीत्या भूमिगत लाईन उच्च दाबाचा वीज प्रवाह केवळ एक फूट खोल नाली काढून जमिनीत गाडल्याचे गणेशपूर फाटा येथील घटना, अनर्थ टळला जाफराबाद तालुक्यातील गणेशपूर फाट्यावर ट्रकने उच्चदाब विद्युत वाहिनीच्या खांबाला टक्कर दिल्याने नागरिकांत घबराट निर्माण झाली होती. ग्रामस्थांचे म्हणने आहे. त्यासाठी कोणतीही सुरक्षेची उपाययोजना केलेली नसल्याचा आरोप आहे. गणेशपूर फाटा आणि अकोला देव परिसर हा गावजवळचा ‘रोड टच’ भाग असून येथे दुकाने व लोकवस्ती वाढत

__________________________________________

हा विषय कोणत्याही राजकारणाचा नसून थेट जनतेच्या जीवाशी संबंधित आहे. आज ट्रक धडकला आहे, उद्या एखादी बस धडकू शकते. लोकहितासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन ही धोकादायक लाईन दुसऱ्या सुरक्षित मार्गाने हलवण्यासाठी सहकार्य करावे. …….संतोष औटी…… __________________ आहे. अशा ठिकाणी १ फूट खोल खड्ड्यात हाय व्होल्टेज वायर असणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देणेच आहे. या धोकादायक वाहिनीचा मार्ग तातडीने बदलावा, यासाठी अकोला देव येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान सवडे यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले आहे. तसेच खासदार डॉ. कल्याण काळे आणि आमदार संतोष पाटील दानवे यांच्याकडेही ही वाहिनी दुसऱ्या मार्गाने हलवण्याची मागणी केली आहे. ___________________________________________

टेंभुर्णी पासून पापड सबस्टेशन पर्यंत जी स्टेट लाईन टाकलेली आहे. रस्त्याच्या कडेलाच घेण्यात आलेली आहे. एका सुज्ञ नागरिकाने असे सांगितले की, त्या कॉन्ट्रॅक्टरला अनेकांनी सांगितले होते की स्टेट लाईन रोड लगत होत आहे यातून अपघात होण्याची शक्यता आहे परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरने ऐकलेले नव्हते. त्याचा परिणाम हा आज दिसून आला आहे. थोडक्यात अनर्थ कळला नसता फार मोठा अपघात झाला असता आणि आणि जीवितहानी सुद्धा झाली असती. याला जबाबदार असणाऱ्या सर्व यंत्रणांची चौकशी करावी असेही त्या सुज्ञ नागरिकांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे