शिर्डी येथे दिलीप वाघ यांचा ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मान.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 2
सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे भोकरदन तालुक्यातील वरुड येथील समाजसेवक दिलीप शेषराव वाघ यांना ओम साई विकास प्रतिष्ठान व बी. बी.सी. फिल्म प्रोडक्शन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. शिर्डी येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते दिलीप वाघ यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दिलीप वाघ यांनी सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण व समाजहिताच्या कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानामुळे भोकरदन जाफ्राबाद मध्ये परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


