pub-7425537887339079
ब्रेकिंग

मार्च अखेरचे ‘ई-आर 1’ विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन

0 4 1 1 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 9

सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना मार्च 2026 या तिमाहीचे मनुष्यबळ विवरणपत्र (ई-आर 1) सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सेवायोजन कार्यालये (रिक्त पदांची सूचना देणे सक्तीचे) कायदा 1959 नुसार, हे विवरणपत्र दि.30 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन भरणे बंधनकारक असून यात कसूर करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नियोक्त्यांनी आपली माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सादर करावी. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी दिली आहे.
केंद्र व राज्य शासनाची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती) तसेच खासगी क्षेत्रातील ज्या आस्थापनांमध्ये 25 किंवा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, अशा सर्व कारखाने आणि उद्योगांना हे विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विवरणपत्र भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास नियोक्त्यांनी कार्यालयीन वेळेत (सकाळी 10 ते संध्याकाळी 6 सुटीचे दिवस वगळून) ०२४८२-२९९०३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 1 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे