pub-7425537887339079
ब्रेकिंग

पत्रकार संतोष भुतेकर यांच्यावरील हल्ल्याचा टेंभुर्णीत निषेध; गुटखा माफियांवर कठोर कारवाईची मागणी

0 4 4 0 4 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.4

दैनिक ‘जगाचा जगमित्र’चे संपादक संतोष भुतेकर यांच्यावर गुटखा माफियांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा टेंभुर्णी मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांना निवेदन देऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
———————————————————————–
पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाईची मागणी
सदरील निवेदनात म्हटले आहे की, “अवैध धंदे करणारे गुटखा माफिया बातम्या छापल्या म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर हल्ले करत असतील तर हे गंभीर आहे. अशा गुन्हेगारांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.”

——————————————————————

पोलिसांना निवेदन सादर
टेंभुर्णी मराठी पत्रकार संघाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांना निवेदन देताना सुनिल भाले, रावसाहेब अंभोरे, पी. जी. तांबेकर, नसीम शेख, संजय राऊत, गजानन देठे, बी. डी. सवडे, अलकेश सोमाणी,अशोक पाबळे राज भाले,दत्ता देशमुख बालाजी शेवाळे, साबेर शेख, फकरू कुरेशी, गजानन शेळके, प्रल्हाद जाधव सुनिल जोशी, प्रेस कौन्सिल महाराष्ट्राचे तालुका अध्यक्ष आशपाक शेख, आशिष पैठणे शेख इंभ्रान शेख गफुर शेख असद भिकन खाँ पठाण आदी पत्रकार उपस्थित होते.

पत्रकारांवर होणारे हल्ले हा लोकशाहीवरचाच हल्ला असून पोलिसांनी अवैध गुटखा विक्री करणाऱ्या माफियांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा पत्रकार संघातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 0 4 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे