pub-7425537887339079
ब्रेकिंग

शौर्य दिन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

0 4 8 9 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.25

शौर्य दिनानिमित्त मंगळवार, दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक, विधवा, त्यांचे अवलंबित व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

भारतीय सैन्यदलाने 29 सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करून केलेल्या कारवाईत अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्यदलाची ही शौर्यपूर्ण कामगिरी जनतेपर्यंत पोहोचविणे व माजी सैनिकांचा यथोचित सन्मान करणे, या उद्देशाने राज्य शासनाने 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 9 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे