टेंभुर्णी येथे महेश नवमी उत्सवात साजरी. अभिषेक,पूजा,महेश वंदना,अनेक कार्यक्रमांनी हर्ष उल्हासात साजरी.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.26
टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने महत्वाची असलेली महेश नवमी मोठ्या आनंदाने उत्सवात साजरी करण्यात आली.या वेळी सकाळी येथील महादेव मंदिर मध्ये डॉ प्रशांत काबरा यांनी सपत्नीक पूजा अभिषेक करून आरती करण्यात आली. या वेळी समाजाचे महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात येथील इ बी के विद्यालय येथे सगळे नियोजित कार्यक्रम पार पडले.या वेळी महिला मंडळ कडून महेश वंदना करून देव महादेव यांची पूजा आरती करण्यात आली. टेंभुर्णी हे गावं तालुक्यातील सर्वात मोठे गाव असल्याने येथे माहेश्वरी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने जाफ्राबाद माहोरा व तालुक्यातील सर्व समाज बांधव येथे एकत्र आल्याने कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्यात आला.या छोट्या खानी कार्यक्रमाचे सूत्र संचलन कल्पेश सोमाणी यांनी केले तर या वेळी संतोष काबरा माझी तालुका अध्यक्ष अलकेश सोमाणी व प्रशांत काबरा यांची समयोचित भाषणे झाली.या वेळी समाजातील ज्येष्ठ सर्व श्री घनश्यामदास काबरा, नंदलाल काबरा,पुरुषोत्तम धूत, गणेशलाल सोमाणी,यांच्या सह आदी मान्यवर महिला पुरुष बाळ गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजातील होतकरू विद्यार्थी चांगल्या मार्कने पास झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या परिवार जणांचा या वेळी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.




