pub-7425537887339079
ब्रेकिंग

सुयश कॉलेज ऑफ फार्मसीत १६ सप्टेंबर रोजी दीक्षांत समारंभ संपन्

0 5 3 0 8 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.17

जिजामाता ग्रामीण विकास व शिक्षण संस्था, जाफराबाद संचलित सुयश कॉलेज ऑफ फार्मसी, वरूड बु., ता. जाफ्राबाद , जि. जालना येथे बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी पदवीधर विद्यार्थ्यांसाठी दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या समारंभात बॅचलर ऑफ फार्मसी (B.Pharm) अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला . विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा सन्मान करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सौ. सुरेखाताई संजय लहाने, अध्यक्ष, जिजामाता ग्रामीण विकास व शिक्षण संस्था, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अमित आरसोडे (MBBS, MD Medicine) तसेच श्री. विलासअप्पा शिंदे, सरपंच, वरूड बु.तसेच संस्थेतर्फे सुयश भैय्या लहाने यांची उपस्तिती लक्षनीय ठरली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व स्वागत गीताने करण्यात आली. प्रस्ताविक प्राध्यापक रवींद्र मापारी यांनी केले. तसेच विद्यार्थी शिक्षक व प्राचार्य डॉ विजय पवार व प्रमुख पाहुण्यांनी या कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि शैक्षणिक प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्प्याचा गौरव करणारा हा दीक्षांत समारंभ “यशाचा उत्सव आणि उज्ज्वल भविष्याकडे एक पाऊल” ठरणार आहे. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, व्यावसायिक प्रगती आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल कारकीर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. शेवटी आभार प्रदर्शन डॉक्टर स्वप्नील भराड यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 0 8 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे