pub-7425537887339079
ब्रेकिंग

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी श्रुती म्हात्रे

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23

काँग्रेस पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसार व्हावा, उत्तमपणे संघटनात्मक बांधणी व्हावी, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय समितीने विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात महाराष्ट्रात पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी काँग्रेसच्या कट्टर एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्या असलेल्या व गोर गरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी नेहमी झटणाऱ्या श्रुती शाम म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या एकनिष्ठ कट्टर प्रामाणिक कार्यकर्त्या म्हणून श्रुती म्हात्रे यांची ओळख आहे. शिवाय प्रसिद्ध महिला सामाजिक कार्यकर्त्या व कामगार नेत्या म्हणूनही त्या सर्वांना सुपरिचित आहेत. श्रुती म्हात्रे यांना त्यांचे वडिल कामगार नेते, काँग्रेसचे जेष्ठ नेते स्व. शाम म्हात्रे यांच्याकडून राजकारणाचा वारसा मिळाला. वडिलांचा विचार कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्रुती म्हात्रे सुरवातीपासूनच कार्यरत आहेत. श्रुती म्हात्रे यांनी आजपर्यंत हजारो कामगारांना, गोर गरीब जनतेला न्याय दिला आहे. काँग्रेस पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसार केला आहे. काँग्रेस पक्षाची उत्तम संघटनात्मक बांधणी केली आहे.सध्या श्रुती म्हात्रे या कोकण श्रमिक संघाच्या अध्यक्षा, शाम म्हात्रे फॉउंडेशनच्या अध्यक्षा, एकता कॅटलीस्ट संघटनेचे अध्यक्षा, आगरी शिक्षण संस्थेचे सहसचिव, आगरी शिक्षण संस्था शाळा समितीचे अध्यक्षा, हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिलचे सदस्य असे अनेक पदे भुषवित आहेत. अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहेत. त्यांच्या या सर्वच कार्याची दखल घेत त्यांच्यावर काँग्रेस पक्षाने विश्वास दाखवत पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी निवड केली आहे. जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने श्रुती म्हात्रे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आनंद व समाधान व्यक्त करत पेढे वाढून या निर्णयाचे व निवडीचे स्वागत केले. सर्वच राजकीय पक्षाशी चांगले संबंध असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी श्रुती म्हात्रे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. श्रुतीताई म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माझी निवड घोषित करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे साहेब, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी साहेब, AICC सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल साहेब, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंनीथला साहेब, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, संघटन सृजन अभियान निरीक्षक रागिणी नायक मॅडम, गटनेते विजय वडेट्टीवार साहेब, गटनेते सतेज पाटील साहेब, CWC सदस्य बाळासाहेब थोरात साहेब, मार्गदर्शक गणेशजी पाटील साहेब, मार्गदर्शक संध्याताई सव्वालाखे मॅडम, पर्यवेक्षक तौफिक मुलानी साहेब, श्रीरंग बर्गे साहेब, आमचे मार्गदर्शक आर.सी घरत साहेब, प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर साहेब, नंदाताई म्हात्रे, श्रद्धा ताई ठाकूर या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते.काँग्रेस पक्षाची विचारधारा, संघटन मजबूत करण्यासाठी मी या पदाचा पुरेपूर वापर करेन. ज्येष्ठाचे मार्गदर्शन घेवून, सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेवून सर्व समजघटकांसाठी कार्यरत राहीन.असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे