मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशाची संधी; 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा
जालना/प्रतिनिधी,दि.16
सन 2026-27 करीता राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयम योजनेंतर्गत व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या नियमित/विद्यमान (RENEWAL/EXISTING) विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शासनस्तरावरून प्राप्त झाले आहे. तरी शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत अर्ज करताना फक्त जि. जालना हद्दीतील महाविद्यालयातील (OBC, VJNT, EWS, SBC) नियमित/विद्यमान विद्यार्थ्यांनीच ऑनलाइन/ऑफलाईन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा तसेच त्याची प्रत विद्यार्थ्यांनी मुलांचे शासकीय वसतिगृह, निरामय हॉस्पिटल, निसर्ग गार्डन जवळ, जुना जालना व विद्यार्थिनी मुलींचे शासकीय वसतिगृह, वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ यांची इमारत, छत्रपती कॉलनी, जुना जालना येथे जमा करावे. जालना तालुका वगळून इतर तालुक्यातील नियमित/विद्यमान विद्यार्थ्यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयम योजना (NT-C) व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (OBC, VJNT, SBC) या योजनांचे अर्ज सादर करण्यासाठी दि. 25 नाव्हेंबर, 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयम योजनेंच्या नियमित/विद्यमान विद्यार्थ्यांनी ऑनलाइन/ऑफलाईन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह इतर मागास बहुजन कल्याण, जालना या कार्यालयात अर्ज सादर करावा असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांनी केले आहे.




