pub-7425537887339079
ब्रेकिंग

म्हसरूळ येथील समाधान शेजुळ यांची पीएसआय पदी निवडीमुळे जांगी स्वागत

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]
  1. टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.6

जाफराबाद तालुक्यातील म्हसरूळ येथील श्री समाधान हिम्मतराव शेजुळ यांची पीएसआय पदी वर्णी लागली आहे.त्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर पीएसआय पदाची परीक्षा पास होऊन पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण केले. या अगोदर महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत होते.ते शेतकरी कुटुंबातील ते म्हसरूळ सारख्या खेडेगावातून पीएसआय पदी निवड होणे ही एक अभिमानाची बाबत आहे.त्यांच्या या गोष्टीची दखल घेऊन म्हसरूळ येथील नागरिकांनी त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले. ते माहोरा येथून येत असताना छत्रपती शिवाजी चौक माहोरा येथे फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळून माहोरा आणि म्हसरूळ येथील नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.यावेळी माहोरा येथील सरपंच श्री गजानन पाटील लहाने,बजरंग दादा बोरसे, मंगेश लहाने सरपंच म्हसरूळ, भास्कर आबा जाधव, मेहमूद भाई माहोरा,पत्रकार मुरलीधर डहाके, माजी सरपंच रविंद्र बदर तसेच माहोरा आणि म्हसरूळ येथील नागरिकांनी व महिला यांनी स्वागतासाठी खूप मोठी गर्दी केली होती. उपस्थितीत सर्वांना त्यांचे शाल देऊन स्वागत केले.
तसेच म्हसरूळ येथील नागरिकांनी डीजे लावून भव्य मिरवणुक काढली होती.मुलांनी डीजे समोर नाचून आपला आनंद व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे