संतनाथ बाबा तिसरे पुण्यस्मरण व समाधी सोहळा निमित्त भाविकांनी दिला स्मृतीस उजाळा

पुणे/डी.आत्माराम,दि 16
येथील गंगाधाम परिसरातील ‘ॐसाई विश्व नरेंद्र धाम येथे प.पु.श्री.सद्गुरु संतनाथ बाबांचा तिसरा पुण्यस्मरण व समाधीसोहळा निमित्ताने विविध धार्मिक ,अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करुन भाविकांनी उत्स्फुर्तपणे भजन सादर करुन बाबांच्या स्मृतीस उजाळा दिला. गंगाधाम परिसरात प.पु.संतनाथ बाबा यांनी स्थापन केलेल्या “ॐश्री साई विश्व नरेंद्र धाम ” येथे संतनाथ बाबांचा तिसरा पुण्यस्मरण व समाधी सोहळा आयोजित करण्यात आला होता.या पुण्यस्मरण दिनी पहाटे पासुन ते रात्री पर्यंत अभिषेक,आरती,हवन,धुपआरती, भजन,सांजआरती महाप्रसाद ,शेजआरती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी सद्गुरु विश्वनाथ बाबा मंदिरातील संतनाथ बाबांच्या समाधी,चरण पादुका व प्रतिमेचे दर्शन भाविक -भक्तानी घेतले.या भाविक भक्तांना आईमाता -गुरुमाऊली यांनी आशिर्वाद दिले.संतनाथबाबांचे तिसरे पुण्यस्मरण निमित्त अनेक भाविकांना त्यांच्या समस्या निवारण मधुन दिलासा देणारे असे “भाविकांचे श्रध्दास्थान संतनाथ बाबा “यांच्या जीवनावर आधारित अनुभूती कार्याचा लेख पत्रकार डी.आत्माराम यांनी प्रसारित केला.तर एक भाविक-भक्त रोहित पंडीत यांनी संतनाथ बाबांच्या सहवासातुन समस्या निवारण व आलेली प्रचिती अनुभव लेखातुन व्यक्त केली.प्रामुख्याने ईशा पाटोळे हिने शाडुमाती व इतर मातीच्या प्रक्रियेतुन ‘संतनाथ बाबांची हुबेहुब प्रतिमा साकारली.तिच्या या कला कौशल्याचे याप्रसंगी अनेक भाविकांनी कौतुक केले. या कार्यक्रमात श्री सद्गुरु साई विश्वनाथ धाम दरबार सेवेकरी मंडळाच्या वतीने भक्तीसंगीत व भजन सादर करण्यात आले.यामध्ये सुजाता कोठारी,साई रांका ,प्रणव रांका ,राज खोल्लम,एल.के .गुप्ता आदींनी सहभाग घेऊन श्री साई,विश्वनाथ ,संतनाथ बाबा यांचेवरील आधारीत भजन सादर केले.तर ढोलकीची अत्यंत मनमोहक साथ सोहन मानकर यानी दिली.कार्यक्रमातील शिवलिंग सजावट भरत कांबळे यांनी केली.तसेच विश्वनाथ बाबा मंदिर व संतनाथ बाबा प्रतिमा स्थान आकर्षक सजावट-डेकोरेशन नितिन पेठारे,ज्ञानेंद्र पासवान यांनी करुन भाविकांचे लक्ष वेधले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यास सरपंच शशिकांत मोरे ,महादेव जाधव,सुरेश काळे,साहिल शाह,कृष्णा खेडेकर ,जयप्रकाश गुप्ता आदीनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास भाविकजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी आरती,महाप्रसादाचा लाभ घेतला.



