अल्पशा आजाराने ओंकार अशोक गरड यांचे दुःखद निधन

काजळा/प्रतिनिधी, दि 19
अत्यंत दुःखद वार्ता अशी की, अशोक भागीनाथ गरड यांचे चिरंजीव चि. ओंकार अशोक गरड (वय १७ वर्षे) यांचे आज दिनांक १९ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी उपचारादरम्यान ओरिअन सिटीकेअर हॉस्पिटलमध्ये छ.संभाजीनगर येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
ओंकार हा मनमिळावू, शांत स्वभावाचा व सर्वांशी प्रेमाने वागणारा युवक होता. त्याच्या अकाली जाण्याने गरड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरात शोककळा पसरली आहे.
त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण,नातेवाईक व मित्रपरिवार असा परिवार आहे.
ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो व गरड परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
Live न्युज महाराष्ट्र परिवारा तर्फे ओंकारच्या आत्म्यास शांती मिळो अशी प्रार्थना!



