संजीवनी इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा संपन्न

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.24
टेंभुर्णी ता जाफराबाद येथील संजीवनी इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पालखी सोहळ्यात लहान चिमुकल्यांनी केलेल्या विठ्ठल,रखुमाई, वारकरी, विनाधारी अश्या आकर्षक वेशभूषेला गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव झाला. सर्वप्रथम विठ्ठल व रखुमाई यांची आरती घेण्यात आली त्यानंतर गावातून पालखी सोहळा काढण्यात आला. यामध्ये अनेक गावकऱ्यांनी पालखी आपल्या दारी आल्यामुळे मनोभावे पूजा अर्चना केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे प्राचार्य प्रा सतीश जाधव सर, भाग्यश्री जाधव मॅडम, वैशाली पंडित मॅडम,शीला जाधव मॅडम, वैष्णवी उखर्डे मॅडम,हिना शेख मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले. चिमुकल्या विद्यार्थ्यांना खाऊ(चॉकलेट) वाटप करून पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली




