चित्रकार संतोष आवटी यांच्या वारीच्या 108 चित्र प्रदर्शनास वेद रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे सर्वेसर्वा डॉक्टर रवींद्र पाटील यांच्या शुभेच्छा, आवटी यांचा सत्कार

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.18
टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील चित्रकार संतोष बाबुराव आवटी यांचा आषाढी वारी निमित्त, विठ्ठलावरील 108 चित्रांचा प्रदर्शन 25 जुलै 2026 ते 27 जुलै 2026 पर्यंत जालना येथील अजिंठा चित्रकला महाविद्यालयात भरणार आहे. इतिहास प्रबोधन संस्था व वेद रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे जे शिवचरित्र साहित्य संमेलन भरले होते त्या शिवचरित्र साहित्य संमेलनाचा लोगो जगभरात प्रसिद्ध करण्यामध्ये चित्रकार संतोष बाबुराव आवटे यांचा सिंहाचा वाटा आहे. चित्रप्रदर्शन सुद्धा जगभरामध्ये प्रसिद्ध झाले. त्या इतिहास प्रबोधन संस्थेचे व वेद रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे सर्वेसर्वा डॉक्टर रवींद्र पाटील, व संस्थेच्या सचिव भारतीताई साठे यांनी नुकतीच चित्रकार संतोष बाबुराव यांच्या घरी त्यांच्या चित्र प्रदर्शनासाठी शुभेच्छा पर भेट दिली. याप्रसंगी त्यांच्या चित्र प्रदर्शनास शुभेच्छा देऊन त्यांचा येतोच सन्मान करण्यात आला. याप्रसंगी वेद रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे प्रांत उपाध्यक्ष प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर यांची आवर्जून उपस्थिती होती. याप्रसंगी आवटी परिवारातर्फे उपस्थितांचे व शुभेच्छा देणाऱ्यांची यथोचित सत्कार करण्यात आला. या चित्र प्रदर्शनाबद्दल चित्रकार संतोष बाबुराव यांनी त्यांना संपूर्ण माहिती दिली व 108 चित्र प्रदर्शनामध्ये ज्या चित्रांवर आधारित वोडवारीचे पुस्तके येणार आहे त्याचे सुद्धा लिखाण सुरू असल्याचे चित्रकार संतोष बाबुराव यांनी त्यांना दिली. पुढील वर्षी नक्कीच ते पुस्तक या चित्रपटदर्शनाच्या संदर्भामध्ये प्रकाशित होईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या पुस्तकाचे प्रकाशन व संपादकीय शब्दप्रभू प्रकाशन जळगाव हे करणार असून यामध्ये चित्रकार संतोष बाबुराव आवटी व प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर यांच्या विठ्ठलावर आधारित कविता असणार आहेत. या चित्रपटदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा व वारीमध्ये आपण चालत आहोत याचा भास आपल्याला या चित्रपटदर्शनातून होणार आहे पंढरपूरला न जाता वारी गेल्याचा आनंद आपल्याला मिळणार असून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर रवींद्र पाटील यांनी केले आहे.

